आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rafael Nadal Crashed Out Of Wimbledon In Second Round

विम्बल्डन : नदालचे पॅकअप, जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनचा सनसनाटी विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - तब्बल १४ ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. दाेन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन नदालला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह त्याचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. दुसरीकडे चाैथ्या मानांकित स्टॅन वावरिंकाने चाैथी फेरी गाठली. तसेच भारताच्या राेहन बाेपन्नाने विजयासह पुुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत १०२ व्या स्थानावर असलेल्या डस्टिन ब्राऊनने दुसऱ्या फेरीत जगातील माजी नंबर वन राफेल नदालविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. जर्मनीच्या डस्टिनने रंगतदार सामन्यात ७-५, ३-६, ६-४, ६-४ अशा फरकाने धडाकेबाज विजय मिळवला. यासह त्याने तिसऱ्या फेरीत धडक मारली. दुसरीकडे पराभवासह नदालला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्पेनच्या २९ वर्षीय खेळाडूला लढतीत केवळ एकच सेट जिंकता अाला. त्यामुळे त्याला सामन्यातील अापला पराभव टाळता अाला नाही. जर्मनीच्या डस्टिनने चारपैकी तीन सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला. पुरुष एकेरीतील हा सनसनाटी करणारा विजय ठरला.
दमदार सुरुवात करताना जर्मनीच्या खेळाडूने सुरेख खेळीच्या बळावर नदालला चाेख प्रत्युत्तर दिले. तसेच स्पेनच्या खेळाडूनेही या सेटमध्ये बाजी मारण्यासाठी जाेेरदार प्रयत्न केले. मात्र, टायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेल्या सेटमध्ये डस्टिनला यश मिळाले. त्याने हा सेट जिंकून लढतीत अाघाडी मिळवली. त्यानंतर माजी नंबर वन नदालने शानदार कमबॅक करून दुसरा सेट अापल्या नावे केला. यासह त्याने लढतीत बराेबरी साधली. मात्र, त्यानंतर केलेल्या गचाळ खेळीचा त्याला माेठा फटका बसला. सलग तिसरा अाणि चाैथा सेट िंजंकून डस्टिनने शानदार विजयाची नाेंद केली.

नदालला दुखापतीचा फटका
खांद्याच्या गंभीर दुखापतीने त्रस्त असलेला नदाल यंदाच्या सत्रात सपशेल अपयशी ठरला. त्याचाच फटका त्याला अाता विम्बल्डन टेनिस स्पर्धेतही बसला. दुखापतीने फाॅर्म गमावलेल्या नदालला दुसऱ्या फेरीत १-३ ने पराभवाला सामाेरे जावे लागले.
मारिया शारापाेवा चाैथ्या फेरीत
माजी विम्बल्डन चॅम्पियन शारापाेवाने महिला एकेरीची चाैथी फेरी गाठली. तिने तिसऱ्या फेरीच्या सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. चाैथ्या मानांकित शारापाेवाने लढतीत राेमानियाच्या इमिला बेगुला ६-४, ६-३ अशा फरकाने धूळ चारली. यासह तिने पुढची फेरी गाठली. या वेळी २९ व्या मानांकित इमिलाने पहिल्या सेटमध्ये प्रत्युत्तराचा प्रयत्न केला हाेता.
वावरिंकाची अागेकूच
फ्रेंच अाेपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने शानदार विजयाची नाेंद केली. यासह त्याने पुरुष एकेरीच्या चाैथ्या फेरीत धडक मारली. चाैथ्या मानांकित वावरिंकाने तिसऱ्या फेरीत स्पेनच्या फर्नांडो वर्दावस्काेला धूळ चारली. त्याने ६-४, ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. याशिवाय त्याने स्पर्धेतील अापली विजयी माेहीम कायम ठेवली. मात्र, यासाठी त्याला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली.
मिलाेस राअाेनिकचे अाव्हान संपुष्टात
कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकचे अाव्हान संपुष्टात अाले. त्याला पुुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अनपेक्षित पराभवाला सामाेरे जावे लागले. या वेळी २६ व्या मानांकित क्रागाेसने सातव्या मानांकित राअाेनिकला ५-७, ७-५, ७-६, ६-३ ने पराभूत केले.
राेहन बाेपन्ना-मेरेगाची तिसऱ्या फेरीत धडक
भारताच्या राेहन बाेपन्नाने अापला सहकारी मेरेगासाेबत पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. या नवव्या मानांकित जाेडीने दुसऱ्या फेरीत बेल्लीस्सी व डुरानवर मात केली. बाेपन्ना-मेरेगाने ७-५, ७-६, ७-६ अशा फरकाने विजय संपादन केला.