आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी हरवल्यानंतर नदालने थांबवला सामना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलाेरका (स्पेन) - जगातील माजी नंबर वन टेनिसस्टार राफेल नदाल हा अमेरिकेच्या प्रसिद्ध खेळाडू जाॅन मॅकन्रोविरुद्ध चॅरिटीसाठी सामना खेळत हाेता. त्याने सामन्यात पहिला सेट गमावला हाेता. सामन्यात बराेबरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतानाच दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिसदरम्यान नदालच्या कानावर वेगळाच अावाज पडला. त्याचे लक्ष विचलित झाले. त्यामुळे त्याने लगेच प्रेक्षागृहावर नजर टाकली. या वेळी एका महिलेच्या रडण्याचा अाणि अाेरडण्याचा अावाज त्याने एेकला. अाेरडत ती अापल्या मुलीच्या नावाचा धावा करत हाेती.

ही गाेष्ट नदालने निरखून पाहिली अाणि त्याने सामना थांबवण्याचा निर्णय झटकन घेतला. त्यानंतर त्याने त्या रडणाऱ्या महिलेला जवळ बाेलावले अाणि विचारपूस केली. पाच वर्षांची मुलगी क्लारा ही हरवल्याचे तिने सांगितले. दरम्यान, त्याने काळजी करू नका, अशा शब्दांत त्या महिलेला धीर दिला तसेच उपस्थित सर्व प्रेक्षकांना क्लाराला शाेधण्याची विनंती केली. स्वत:ही यासाठी सरसावला.
थाेड्या वेळानंतर क्लाराही स्टेडियमच्या एका काेपऱ्यात रडत असताना दिसून अाली. हे पाहताच तिची अाई जाेराने पळत त्या ठिकाणी पाेहोचली अाणि तिने लगेच क्लाराला मिठी मारली.

स्पेनच्या नदालने अशा प्रकारे घडवून अाणलेल्या मुलगी अाणि अाईच्या भेटीचा हा क्षण उपस्थित ७ हजार प्रेक्षकांनी ‘याची देही याची डाेळा’ अनुभवला. सर्वांच्या ताेंडून नदालच्या कार्याची स्तुती झाली. तसेच सर्वांचे डाेळेही पाणावले हाेते.

‘तुम्ही जगातील महान टेनिसपटूशिवाय एक चांगले व्यक्तीदेखील अाहात. अापला सामना थांबवून तुम्ही मुलगी सापडण्यासाठी केलेल्या कामाची मी फार अाभारी अाहे. त्यासाठी मी तुमची ऋणी अाहे,’ अशा शब्दांत त्या महिलेने सर्वंासमाेर नदालचे अाभार मानले.
बातम्या आणखी आहेत...