आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीगमध्ये राफेल नदालकडून फेडररचा पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील माजी नंबर वन राफेल नदालने शनिवारी आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीगमध्ये (आयपीटीएल) स्विस किंग रॉजर फेडररचा पराभव केला. नदालच्या या सनसनाटी विजयासह इंडियन अॅसेसने लीगमध्ये तिसरा सामना जिंकला. या टीमने सामन्यात यूएई राॅयल्सवर ३०-१९ अशा फरकाने मात केली.

तब्बल १५ हजार चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या सामन्यात नदालने पेनल्टी शूटआऊटमध्ये १७ ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररचा पराभव केला. त्यामुळे रॉयल्सला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाने रोहन बोपन्नासोबत नेस्टर-क्रिस्टिनावर ६-४ अशा फरकाने मात केली. त्यामुळे इंडियनला विजय निश्चित करता आला.