आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्ले काेर्ट बादशहाचे कमबॅक; राफेल नदाल बनला नवव्यांदा बार्सिलोना चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलाेना- सलगच्या पराभवांची मालिका खंडित करून क्ले काेर्टवरचा बादशहा राफेल नदालने दमदार पुनरागमन केले. त्याने बार्सिलाेना अाेपन टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. जगातील माजी नंबर वन नदालने अाठवड्यात सलग दुसऱ्या विजेतेपदावर नाव काेरले. यापूर्वी त्याने माेंटे कार्लाे मास्टर्सचा बहुमान पटकावला. यासह ताे पुन्हा एकदा टेनिसच्या विश्वात अापले वर्चस्व निर्माण करण्यासाठी सज्ज झाला. अागामी ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

स्पेनच्या नदालने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये दाेन वेळच्या विजेत्या केई निशिकाेरीचा पराभव केला. त्याने ६-४, ७-५ अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. या विजयाच्या बळावर नदालला गुर्ल्लेमाे विलासच्या क्ले काेर्टवरील ४९ किताब जिंकण्याच्या विक्रमाला बराेबरी साधता अाली.

नदालने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. मात्र, त्याला दुसऱ्या सेटमध्ये निशिकाेरीने झुंजवले हाेते.