आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनचा राफेल नदाल तीन वर्षांनंतर नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - सततचा पराभव अाणि दुखापतीची मालिका खंडित करताना स्पेनच्या राफेल नदालने साेमवारी जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन काबीज केले. त्याने इंग्लंडच्या अँडी मरेवर कुरघाेडी करून अव्वल स्थानावर धडक मारली. त्याने तब्बल तीन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हे यश संपादन केले अाहे. यासाठी त्याला दरम्यानच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, अत्यंंत सरस अाणि चुरशीने यश मिळवत स्पेनचा राफेल नदाल नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला. त्याने जुलै २०१४ मध्ये नंबर वनचे स्थान गाठले हाेते.    

 गत अाठवड्यातच नंबर वनची हुलकावणी : गत अाठवड्यात अनपेक्षित पराभवाने नदालला एका पावलावर असलेल्या नंबर वनने हुलकावणी दिली हाेती. गत अाठवड्यात  कॅनडाच्या डेनिस शापाेवालाेवने माँट्रियल अाेपनच्या तिसऱ्या फेरीत माजी नंबर वन राफेल नदालविरुद्ध  ३-६, ६-४, ७-६ ने विजय संपादन केला. त्यामुळे नदालची नंबर वनची संधी हुकली हाेती.   

नदाल तिसऱ्यांदा अव्वल स्थानावर
नदालने करिअरमध्ये तिसऱ्यांदा नंबर वनचे स्थान गाठले. त्याने २००८ मध्ये प्रथमच या स्थानावर धडक मारली हाेती. त्यानंतर त्याला दुसऱ्यांदा हे स्थान गाठण्यासाठी सहा वर्षांपर्यंत झंुज द्यावी लागली. त्याने जुलै २०१४ मध्ये दुसऱ्यांदा नंबर वनचे स्थान गाठले हाेते. अाता पुन्हा तीन वर्षांनंतर त्याने अाॅगस्ट २०१७ मध्ये नंबर वनच्या सिंहासनाला गवसणी घातली.   

कॅराेलिना प्लिस्काेवा अव्वलस्थानी कायम
चेक गणराज्यच्या कॅराेलिना प्लिस्काेवाचे  नंबर वनचे स्थान कायम राहिले अाहे. तिला सिनसिनाटी मास्टर्समध्ये फार काळ अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही.  त्याचा तिला क्रमवारीत फटका बसणार हाेता.

जखमी मरेला क्रमवारीत धक्का
दुखापतीमुळेअँडी मरे हा विश्रांती घेत अाहे. याचा त्याला धक्का बसला. यातून त्याला नंबर वनचे सिंहासन गमवावे लागले.  ताे  सिनसिनाटी व माँट्रियल अाेपनमध्ये खेळला नाही.

हालेपचे नंबर वनचे स्वप्न भंगले
राेमानियाच्या सिमाेना हालेपचे  नंबर वन महिला टेनिसस्टार हाेण्याचे स्वप्न भंगले. तिला फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. किताबासह तिला नंबर वन गाठता येणार हाेते.
बातम्या आणखी आहेत...