आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rajasthan Royals Co Owner Raj Kundra Banned Life Time

IPL Spot Fixing: शिल्पाचा 'राज' बदनाम, वाचा कशी करतो अब्जावधींची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल सट्टेबाजीच्या संदर्भात जस्टिस लोढा कमिटीने आज सुनावनी केली. या कमिटीने निर्णयात राजस्थान टीमचा सहमालक राज कुंद्राला क्रिकेटशी कोणत्या प्रकारचा संबंध ठेवण्यावर कायम स्वरुपी बंदी घातली आहे.

बॉलीवुड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा ज्या आयपीएलमूळे प्रसिद्धीच्या झोतात आला. आज त्याच आयपीएलमुळे त्याची प्रतिमा मलीन झाली आहे. लंडन येथील यशस्वी बिझनेसमन असलेल्या राज कुंद्राची ओळख भारतात आधी अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती अशी होती. नंतर ती आयपीएल टीमचा सह-मालक अशी झाली. 2013 च्या (आयपीएल-6) पासून तो आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चर्चेत होता.
जगात यशस्वी उद्योजक म्हणून राज कुंद्राची ओळख आहे. त्याच्या जवळ साधारणपणे 2400 कोटींची प्रॉपर्टी आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, "आज मी ज्या पद्धतीने जीवन जगत आहे, लहानपणी ते बिलकूल उलटे होते."

18 व्या वर्षीच केली व्यवसायाला सूरुवात
मध्यम वर्गीय कुटू्ंबात जन्मलेल्या राजला आई-वडिलांनी फार हालाकीच्या परिस्थितीत वाढवले. जेव्हा तो 18 वर्षांचा होता तेव्हा वडिल म्हणाले, 'एकतर आपले रेस्टॉरंट चालव नाहीतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय शोध.' राजने ही गोष्ट गांभिर्याने घेत उद्योगाला सुरूवात केली.
शॉलच्या विक्रीने सुरू केला व्यवसाय
राज कुंद्रा सर्वप्रथम दुबईला गेला. तेथे तो काही हिरे व्यापाऱ्यांना भेटला. मात्र व्यवहार होऊ शकला नाही. तेथून तो
नेपाळला गेला. त्याने तेथे काही पशमीना शॉल खरेदी केल्या आणि त्या इंग्लंड मधील ब्रँडेड स्टोअर्समधून विक्रीला सुरुवात केली. जेवढ्या लवकर त्याचा हा उद्योग वाढला तेवढ्याच लवकर या उद्योगात स्पर्धादेखील वाढली. या नंतर राज पुन्हा दुसऱ्यांदा हिऱ्यांच्या उद्योगासाठी दुबईला गेला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नही.
आज तो साधारणपणे 10 कंपन्यांचा मालक अथवा भागिदार आहे. राज कुद्राला 2004 मध्ये ब्रिटिश पत्रिकेने सर्वात श्रीमंत आशियाई ब्रिटिशच्या लिस्टमध्ये 198वे स्थान दिले होते. त्याच्या कमाईचा एक हिस्सा आयपीएलच्या माध्यमानेही येतो.

पुढील स्लाइड्सवर वाचा, राज कुंद्राच्या उद्योगांविषयी...
...........
अशी होते राजची कमाई
- 2009 मध्ये आयपीएल टीम राजस्थान रॉयल्समध्ये शिल्पा अणि राजने केली 74 कोटी रुपयांत 12 टक्के भागिदारी घेतली.
- 2012 मध्ये अॅक्टर संजय दत्त आणि राजने मिळून देशातील पहिली मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटिंग लीग (सुपर फाईट लीग) ची सुरुवात.
...........
कोठे-कोठे पसरला आहे उद्योग?
आज राज विविध क्षेत्रांत उद्योग करतो आणि त्याची विविध कंपन्यांमध्ये भागिदारी आहे. RK Collections Ltd नावाने त्याने फॅशन कंपनीची स्थापनाही केली आहे.
राज कुंद्राच्या कंपन्या
- Essential General Trading कंपनीमध्ये राज सीईओ आहे.
- UK Tradecorp Ltd.मध्ये राज CEO आहे. 2002 मध्ये सुरू झालेली ही कंपनी कन्झुमर प्रोडक्ट्सची विक्री करते.
- Groupco Developers, रियल इस्टेट फर्म
- Ashwini Steel, ही कंपनी स्क्रॅपपेक्षा हलके स्टील बनवते.
- TMT Global, स्टॉक ट्रेडिंग कंपनी
Essential Sports and Media,
- प्रोडक्शन अँड डिस्ट्रिब्यूशन कंपनी (स्पोर्ट्स के अलावा)
- Iconic Investments, प्राइव्हेट फंड ट्रेडिंग फर्म
- V8 Gourmet Group, यूकेतील रेस्टॉरंट चैन, ज्यात राजची 33 टक्के भागिदारी आहे.
या शिवाय त्याचे दुबईमध्ये एक ट्रेडिंग फर्म सुद्धा आहे. या पैकी काही कंपन्यांवर त्याची मालकी, तर काहींमध्ये भागिदारी आहे.
...........
परस्पर सहकार्याने करतात उद्योग
- फिल्म प्रोडक्शन कंपनी, मार्च 2014 मध्ये 'ढिश्कियाऊं' सिनेमा तयार केला.
- 2014 मध्ये टीव्ही शो 'सोने का दिल' तयार केला.
- सतयुग गोल्ड नावाने फर्म, ज्यात शिल्पा चेअरपर्सन आणि राज CEO आहे.
- कुंद्रा अँड कुंद्रा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये राज-शिल्पाची भागिदारी. ही कंपनी राज कुंद्राचीच आहे.
- नुकताच शिल्पाने एक नाईटक्लबदेखील सुरू केला आहे. यातही राजची भागिदारी आहे.