आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोच झाल्यानंतरसुद्धा देशासाठी खेळत राहणार; राणी रामपाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) भारतीय महिला संघाची स्टार फॉरवर्ड राणी रामपालला सहायक प्रशिक्षकपदाची ऑफर दिली आहे. एकाm प्रसिद्धिपत्रकाद्वारे साईने ही माहिती दिली. राणी भारतीय महिला संघाची नंबर वन फॉरवर्ड असून तिने हरियाणा येथील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बलदेव सिंग यांच्या शाहबाद अकादमीत आपल्या खेळावर मेहनत घेत प्रगती केली.
साईने युवा महिला खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी राणी रामपालला सहायक कोच बनवण्याचा निर्णय घेतला. तिच्या सहवासाने युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. कोच म्हणून आपले गुण विकसित करण्यासाठी तिला सर्व सुविधा, सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्या जातील.
शिबिर आणि स्पर्धेनंतर फावल्या वेळेत ती प्रशिक्षणासाठी गरज असलेल्या पैलूंवर मेहनत घेईल.

राणीची कारकीर्द अशी
- वयाच्या १५ व्या वर्षी २०१० च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाची सदस्य बनली.
- २००९ मध्ये रशियाच्या कजान येथे चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत चार गोल करून तिने भारताला किताब जिंकून दिला.
- २०१० मध्ये एफआयएचने महिला यंग प्लेअर अवाॅर्ड देऊन सन्मानित केले.
- २०१३ मध्ये त्याच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर भारताने ज्युनियर वर्ल्डकपमध्ये कांस्यपदक जिंकले.
- कजान चॅलेंज स्पर्धेत तिला स्पर्धेत सर्वाधिक स्कोअर करणारी खेळाडू आणि "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कार जाहीर झाला.
- २०१५ च्या हॉकी वर्ल्ड लीगच्या सेमीफायनल्समध्ये भारताला पाचवे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
बातम्या आणखी आहेत...