आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोनाल्डोच्या गोलनंतरही रिअल माद्रिद बरोबरीत; माद्रिदच्या राफेल वराचा आत्मघाती गोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद- इंग्लिश प्रीमियर लीगचा (ईपीएल)  टोटेनहॅम हॉटस्पुर संघाने यूएफ चॅम्पियन लीगची सध्याची चॅम्पियन टीम रिअल माद्रिदला त्याच्या घरच्या मैदानावर बरोबरीत रोखले. हा सामना १-१ गोलने ड्राॅ झाला. माद्रिदच्या राफेल वराने आत्मघाती गोलच्या बळावर टोटेनहॅमने २८ व्या मिनिटाला १-० गाेलने आघाडी मिळवली. हाफपूर्वी रोनाल्डोने पेनल्टीवर शानदार गोल करत आपल्या संघाला बरोबरीत आणून ठेवले. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघ एकही गोल करू शकला नाही. 
  
या निकालामुळे एच गटात टोटेनहॅम संघ गटात सात गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला. माद्रिदचेदेखील तीन सामन्यांत सात गुण आहेत. दोन्ही संघांदरम्यान गोलचे अंतर (+५) सारखेच आहे. मात्र, घरच्या बाहेर जास्त गोल केल्याने टोटेनहॅमला पहिले स्थान दिले. या गटात जर्मन संघ बोरुसिया डॉर्टमंंडने एका गुणासह तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. एपोएल निकोसियाचा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. निकोसियाने इतर एका सामन्यात  जबरदस्त कामगिरी करत डॉर्टमंड संघाला १-१ गोलने बरोबरीत रोखण्यात यश मिळवले.   

रोमांचक लढतीत मँचेस्टर सिटीची नेपोलीवर मात   
इंग्लिश प्रीमियर लीगच्या या सत्रात मँचेस्टर सिटी संघाने चॅम्पियन लीगमध्ये देखील शानदार प्रदर्शन कायम ठेवले. आपल्या घरच्या मैदानावर खेळताना नेपोलीला रोमांचक लढतीत २-१ ने हरवले. सिटीकडून रहीम स्टलिंगने नवव्या मिनिटाला आणि गॅब्रिएल जीससने १३ व्या मिनिटाला गोल केले. नेपोलीसाठी अमाडोऊ दियावाराने ७३ व्या मि. पेनल्टीवर गोल केला. विजयासह ३ सामन्यात ९ गुणांसह मँचेस्टर सिटी गटात अव्वलस्थान गाठले.

लिव्हरपूलचा बाहेरच्या मैदानावरील विक्रम  
इंग्लिश प्रीमियर लीगचा  (इपीएल) संघ लिव्हरपूलने चॅम्पियन लीगच्या इ गटातील सामन्यात स्लोव्हेनियाचा संघ एनके मारिबोरवर ७-० गोलने विक्रमी विजय मिळवला.  लिव्हरपूलकडून रॉबर्टाे फर्मिनो, मोहंमद सलाहने प्रत्येकी २-२ गोल केले. फिलिप कोटिन्हो, अॅलेक्स ओक्सलेड व ट्रेंट अॅलेक्झांडर यांनी प्रत्येकी १ गोल केला. या लीगमध्ये कोणत्याही इंग्लिश संघाने विरोधी संघाच्या मैदानावरील मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. 
बातम्या आणखी आहेत...