आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल माद्रिद विक्रमी 15 व्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या फायनलमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद- रिअल माद्रिदने विक्रमी १५ व्यांदा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रिअल माद्रिदला सेमीफायनलच्या दुसऱ्या लेगमध्ये अॅटलेटिको माद्रिदने २-१ ने हरवले. या पराभवानंतरही रिअल माद्रिदने फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलच्या पहिल्या लेगमध्ये रिअल माद्रिदने ३-० ने विजय मिळवला होता. दोन्ही सेमीचे अंतर मिळून रिअल माद्रिदने एकूण ४-२ असा विजय मिळवत फायनल प्रवेश साजरा केला. गतचॅम्पियन रिअल माद्रिदने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जागा मिळवली. रिअल माद्रिदचे हे चार सत्रातील तिसरे फायनल आहे. तीन जून रोजी कार्डिफ येथे होणाऱ्या फायनलमध्ये रिअल माद्रिदसमोर युवेंट्सचे आव्हान असेल. हे दोन्ही संघ तब्बल १९ वर्षांनी फायनलमध्ये समोरासमोर असतील. रिअल माद्रिदने विक्रमी ११ वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे, तर युवेंट्सला केवळ २ वेळा विजेतेपद मिळाले आहे.  

अॅटलेटिको माद्रिदकडून पॉल निगुएजने १२ व्या आणि अँटोनी ग्रिजमॅनने १६ व्या मिनिटाला पेनॉल्टीवर गोल केले, तर इस्कोने सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला संघासाठी तिसरा गाेल केला. रिअल माद्रिदने सलग ६१ सामन्यांत गोल करण्याच्या बायर्न म्युनिचच्या विक्रमाची बरोबरी केली. चॅम्पियन्स लीगमध्ये ५०० गोल करणारा पहिला बनण्यासाठी रिअल माद्रिदला केवळ एका गोलची गरज आहे. दुसरीकडे अॅटलेटिको माद्रिद असा पहिला संघ ठरला आहे, ज्याला सलग तीन वेळा विरोधी संघाला पराभूत केल्यानंतरही स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की सहन करावी लागली. फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रिअल माद्रिदचे मॅनेजर झिनेदिन झिदान यांनी आनंद व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...