आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२९ हजार कोटींतून स्टेडियमचे नूतनीकरण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - जगातील सर्वात लोकप्रिय आणि धनाढ्य फुटबॉल क्लबपैकी एक रिअल माद्रिदचे स्टेडियम बर्नबीयूचे नूतनीकरण होणार आहे. हे नूतनीकरण ४३९ मिलियन डॉलर (जवळपास २९ हजार कोटी रुपये) इतक्या रकमेतून होईल. या स्टेडियमला बदलता येणारे छत मिळेल. या छताला रिमोट कंट्रोलच्या मदतीने सामन्यानंतर गुंडाळून जमिनीखाली ठेवले जाईल. काही कारणांमुळे आक्षेपांमुळे मागच्या वर्षी उच्च न्यायालयाने या नूतनीकरणावर बंदी आणली होती. मात्र, आता क्लबचे अध्यक्ष फ्लोरेंटिनो परेज आणि माद्रिदचे महापौर मानुएला कारमेना यांनी सुधारित आराखडा सादर केला आहे. यानंतर न्यायालयाने बंदी हटवली आहे.
स्टेडियमची प्रेक्षक संख्या ८० हजार आहे. नूतनीकरणानंतरसुद्धा यात वाढ केली जाणार नाही. मात्र, ३ हजार जुन्या खुर्च्या बदलल्या जातील. इतके महागडे काम करण्यासाठी रिअल माद्रिद प्रायोजकाच्या शोधात आहे. प्रायोजक मिळाले तर स्टेडियमच्या नावासोबत प्रायोजकाचेही नाव सोबत जोडले जाऊ शकते. येथे दरवर्षी ४० लाख प्रेक्षक येतात. त्यांना जगातील सर्वश्रेष्ठ सुविधा देण्यासाठी स्टेडियममध्ये बदल करण्यात येणार आहे, असे क्लबच्या अध्यक्षांनी सांिगतले. नूतनीकरणाचे काम २०१७ मध्ये सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...