आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Record Win Of Sania Hinges Team In Womens Doubles

सानिया-हिंगीसचा सलग २८ विजयांचा भीमपराक्रम, गेल्या वर्षी जिंकले नऊ किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी बुधवारी वर्षातील आपल्या दुसऱ्या किताबाकडे आगेकूच करताना क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवला. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसने सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये चीनची चेन लियांग आणि शुआई पेंग यांना ६-२, ६-३ ने हरवले.

सानिया-हिंगीस जोडीचा हा सलग २८ वा विजय ठरला आहे. या विजयासह सानिया-हिंगीसने २२ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली. या दोघींनी १९९४ मध्ये प्युर्टो रिकोची गिगी फर्नांडिस आणि बेलारुसची नताशा जवेरा यांच्या सलग २८ विजयांच्या विक्रमाची बरोबरी केली. सानिया-हिंगीसला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

सानिया आणि हिंगीसने मागच्या वर्षी जोडी बनवली. यानंतर ही जोडी वर्षभर सुपरहिट ठरली. या जोडीने एकापाठोपाठ सलग दहा डब्ल्यूटीए किताब जिंकून वर्ष गाजवले. या वर्षी ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेपासून या जोडीने विजेतेपद जिंकण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. मागच्या वर्षी इंडियाना वेल्सपासून विजेतेपदाची सुरुवात झाली होती.

असा जिंकला सामना
जागतिक क्रमवारीतील नंबर वन सानिया मिर्झा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मार्टिना हिंगीसने क्वार्टर फायनलमध्ये दोन वेळा आपल्या विरोधी जोडीची सर्व्हिस ब्रेक केली. त्यांनी सहजपणे पहिला सेट ६-२ ने जिंकला. लियांग आणि पेंगच्या दुबळ्या सर्व्हमुळे दुसरा सेटसुद्धा सानिया आणि हिंगीससाठी सोपा ठरला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-हिंगीसने दोन ब्रेक पॉइंट मिळवताना सेट ६-३ ने आणि सामना आपल्या नावे केला. सानिया-हिंगीसने क्वार्टर फायनलमध्ये सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून विरोधी जोडीवर वर्चस्व राखले. दोन्ही सेट आणि सामना जिंकण्यास या जोडीला फार संघर्ष करावा लागला नाही.

सेमीत कठीण आव्हान
आता सेमीफायनलमध्ये सानिया-हिंगीसपुढे टिमिया बाबोस आणि कॅटरिना श्रीबोटनिक तसेच रालुका ओलारू आणि यारश्लोवा श्वेडोवा यांच्यातील विजेत्या जोडीशी सामना होईल. या दोन्ही जोड्या तुल्यबळ असून सेमीफायनलचा सामना आव्हानात्मक असेल.

हालेप अंतिम चारमध्ये
महिला गटातील जगातील नंबर दोनची खेळाडू रोमानियाच्या सिमोना हालेपने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. पुरुष गटात चौथा मानांकित ग्रिगोर दिमित्रोवने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. महिला एकेरीत अव्वल मानांकित सिमोना हालेपने पाचवी मानांकित आणि मागची उपविजेती चेक गणराज्यच्या कॅरोलिना प्लिस्कोवाला सरळ सेटमध्ये ६-४, ७-५ ने हरवत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. सेमीत तिचा सामना ३० वर्षीय २००४ ची यूएस ओपन चॅम्पियन आणि २००९ ची फ्रेंच ओपन विजेती रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोवाशी होईल. तिने इटलीच्या सारा इराणीला ७-६, ६-० ने हरवले.

सानिया-हिंगीसचे १० किताब
२०१५ : इंडियाना वेल्स, मियामी, चार्ल्सटोन, विम्बल्डन ओपन, यूएस ओपन, ग्वांगझू, वुहान ओपन, बीजिंग आणि डब्ल्यूटीए फायनल्स.
२०१६ : ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धा.