आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्लार्कच्या अात्मघाती गाेलने लढत बराेबरीत!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- स्वीडन टीमने युराे चषक फुटबाॅल स्पर्धेत अायर्लंडला बराेबरीत राेखले. हा रंगतदार सामना १-१ ने बराेबरीत राहिला. अायर्लंड टीमच्या सियारन क्लार्कने केलेल्या अात्मघाती गाेलच्या बळावर स्वीडनचा सामन्यातील पराभव टळला. दुसरीकडे अायर्लंड टीमचे विजयाचे स्वप्न भंगले. मात्र, तरीही या टीमला गटाच्या गुणतालिकेतील अापले दुसरे स्थान कायम ठेवता येईल.

युराे चषकात विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वीडन अाणि अायर्लंड यांच्यातील सामना अधिक राेमांचकपणे खेळवला गेला. त्यामुळे पहिल्या हाफपर्यंतची ही लढत शून्य गाेलने बराेबरीत हाेती. त्यानंतर मात्र दुसऱ्या हाफमध्ये अायर्लंड टीमने दमदार पुनरागमन करताना प्रतिस्पर्धी स्वीडनवर दबाव निर्माण केला. याचाच फायदा घेत वेस हुलाहनने ४८ व्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले. त्यामुळे अायर्लंडला सामन्यात १-० ने अाघाडी घेता अाली. पिछाडीवर पडलेल्या स्वीडनने बराेबरीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र, अायर्लंडच्या खेळाडूंनी हे सर्व प्रयत्न उधळून लावले.

मात्र, ७१ व्या मिनिटाला अायर्लंडच्या क्लार्क इब्राहिमाेविचने केलेल्या अात्मघाती गाेलचा फायदा स्वीडनला झाला. या टीमने १-१ ने बराेबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही दाेन्ही टीम अपयशी ठरल्या.
बातम्या आणखी आहेत...