आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅलिम्पिकसाठी पात्र असलेल्‍या अवतार सिंग अार्थिक अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अागामी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेसाठीचे तिकीट मिळवणाऱ्या भारतीय ज्युदाेकासमाेर हलाखीच्या परिस्थितीमुळे अार्थिक अडचणींचा ‘अवतार’ झाला अाहे. त्यामुळे त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत अाहे. भारताच्या अवतार सिंगने गत महिन्यात अाॅलिम्पिकमधील अापला प्रवेश निश्चित केला. येत्या ५ अाॅगस्टपासून रिअाे अाॅलिम्पिकला सुरुवात हाेत अाहे. अवतार सिंग या स्पर्धेतील ज्युदाेच्या ९० किलाे वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. त्याने प्रचंड मेहनतीच्या बळावर अाॅलिम्पिकमध्ये सहभागी हाेण्याचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, अाता ब्राझीलमधील स्पर्धेत सहभागी हाेण्यापूर्वी त्याच्यासमाेर अनेक अडचणी निर्माण झालेल्या अाहेत.

वडिलांचे तुटपुंजे वेतन
अवतार सिंगचे वडील हे गुरुदासपूर येथील एका रुग्णालयामध्ये काम करतात. त्यांना महिन्याकाठी मिळणारे वेतन हे तुटपुंजे अाहे. तसेच अवतार सिंगची अाई ही गृहिणी अाहे. त्यामुळे त्यांना मुलाच्या खुराकावर खर्च करताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागते. तसेच महागाईमुळे हा खर्च करणेही अाता त्यांना परवडणारा नाही.
बातम्या आणखी आहेत...