आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Rio पॅरालिम्पिक आजपासून: 42 वर्षीय मिशेल कॅनडाची मंत्री; 17 व्या वर्षी अपंग, चौथे पॅरालिम्पिक, विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिक्टोरिया- रिओत पॅरालिम्पिकसाठी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अाहे. १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. कॅनडाची मिशेल स्टिलवेल सध्या रिअाेत दाखल झाली. ४२ वर्षीय मिशेल कॅनडाची कॅबिनेट मंत्री अाहे. तिचे करिअरमधील हे चाैथे पॅरालिम्पिक अाहे. वयाच्या १७ व्या वर्षी मित्रांच्या पाठीमागे पळत असताना शिडीवरून पडली हाेती. पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे अपंगत्व अाले. त्यामुळे व्हीलचेअरलाच अापला अाधार बनवले. तिच्या नावे विश्वविक्रमांची नाेंद अाहे. अाता माेटिव्हेशन स्पीकरही अाहे.

>मिशेलच्या नावे व्हीलचेअर रेसिंगचे तीन विश्वविक्रम अाहेत. तिने यापूर्वी सिडनी (२०००), बीजिंग (२००८), लंडन (२०१२) पॅरालिम्पिकमध्ये सहभाग घेतला हाेता.
> तीन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण राैप्यची कमाई केली. मंत्री झाल्यानंतर पहिली पॅरालिम्पिक स्पर्धा.
> मिशेल ही एकमेव पॅरालिम्पिक धावपटू अाहे, जिने वेगवेगळ्या दाेन खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने सिडनीत व्हीलचेअर रेसिंग व्हीलचेअर बास्केटबाॅलमध्ये हे यश मिळवले.
> मिशेल २०१३ मध्ये पहिल्यांदा अामदार झाली. गतवर्षी क्रिस्टी क्लार्कच्या सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री झाली.

४३५० खेळाडू यंदा सहभागी हाेतील
२३ खेळांचा समावेश
१९ खेळाडू भारताचे

अाता मला स्पीड मिनिस्टर म्हणू लागले...
>शेवटचेसुटीवरकधी गेले हाेते, हे मला अाठवत नाही. पती मार्क हेच घर सांभाळतात. सकाळी ५.३० वाजता उठून सर्व काही कामे अाटाेपून मी वाजता अाॅफिसमध्ये संध्याकाळी सरावाला जाते. लाेक मला स्पीड मिनिस्टर म्हणू लागले अाहेत.
- मिशेल स्टिलवेल, कॅनडा
बातम्या आणखी आहेत...