आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RIO : चीनच्या वांग यिहानला सिंधूचा भारतीय दणका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ - पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये चीनचे ८ वर्षांपासून सुरू असलेले साम्राज्य रिओत संपवले. तिने महिला एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला २२-२०, २१-१९ ने हरवले. यामुळे रिओत भारताच्या पदकाची आशा बळावली आहे. यासह हेसुद्धा निश्चित झाले की, यंदाचे सुवर्ण आणि रौप्यपदक हे एकत्र चीन जिंकू शकणार नाही. २००८ आणि २०१२ च्या फायनलमध्ये चीनच्याच खेळाडू होत्या. मात्र, रिओत त्यांची एकच महिला खेळाडू जुईरुई सेमीत पोहोचली आहे.

दहावी मानांकित सिंधूला सेमीफायनलमध्ये सहावी मानांकित जपानच्या नोजोमी ओकुहाराशी लढायचे अाहे. जपानच्या ओकुहाराने क्वार्टर फायनलमध्ये आपल्याच देशाच्या अकाने यामागुचीला ११-२१, २१-१७, २१-१० ने हरवले. आतापर्यंत सिंधू-ओकुहारा यांच्यात चार सामने झाले आहेत. यापैकी सिंधूला केवळ एकात विजय मिळवता आला. तोसुद्धा २०१२ मध्ये विजय मिळवला होता. सेमीफायनलमध्ये धडक देणारी सिंधू दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. चार वर्षांपूर्वी सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते.

पहिल्या गेममध्ये १७ गुणांनी सिंधू मागे; तरीही मारली बाजी
वर्ल्ड नंबर २ वांग यिहानविरुद्ध सिंधूची सुरुवात चांगली झाली नाही. वांग पहिल्या गेममध्ये ३-०, १२-९, १७-१५ ने पुढे होती. यानंतर सिंधूने पुनरागमन केले. दोन्ही खेळाडू १७-१७, २०-२० असे बरोबरीत होते. यानंतर सलग दोन गेम जिंकून सिंधूने गेम आपल्या नावे केला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ५ गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी गमावली
दुसऱ्या गेममध्ये सिंधूने ९-४ ने सुरुवातीला आघाडी घेतली. नंतर ही आघाडी १८-१३ अशी झाली. मात्र, लंडन ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती वांगने सलग सहा गुण जिंकून पुनरागमन केले. वांग सिंधूच्या १९-१८ अशी पुढे निघाली. मात्र, सिंधूने तिला १९ वरच रोखले. नंतर सिंधूने सलग तीन गुण जिंकून सामना संपवला. विजयानंतर सिंधूने नेटवर जोरदार जल्लोष केला.

४६ शॉटची रॅली रंगली
सिंधू आणि वांग यांच्यातील सामना खूप रोमांचक ठरला. यात तगडे स्मॅश आणि लांबचलक रॅलीज रंगल्या. एक रॅली तर ४६ शॉटची होती. ही रॅली वांगने जिंकली. सलग दोन सेटमध्ये सामना असतानासुद्धा ५४ मिनिटे चालला. याआधी झालेल्या सहा सामन्यांपैकी वांगने िसंधूविरुद्ध चारमध्ये विजय मिळवला होता.

हा सर्वात मोठा विजय
ऑलिम्पिकमध्ये विजयाचा स्वाद वेगळाच असतो. वांगविरुद्ध मिळालेला विजय माझ्या करिअरमधील सर्वात मोठा विजय आहे. मी या विजयाला आणखी पुढे नेऊ इच्छिते. वांगला लांब रॅली आवडतात, हे मला माहिती होते. यामुळे मी स्वत:ला तसे तयार केले. मी पुनरागमन करू शकते हे मला माहिती होते आणि तसेच झाले. - पी.व्ही. सिंधू, भारतीय बॅडमिंटनपटू.
बातम्या आणखी आहेत...