आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअाे ऑलिम्पिक : हिटमध्ये दत्तू ‘सुपरहिट’! पहिल्याच हिटमध्ये गाठले तिसरे स्थान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिअाे - करिअरमधील पहिल्याच अाॅलिम्पिकमध्ये नाशिकचा अार्मिमॅन दत्तू भाेकनळ राेइंग प्रकारात सुपरहिट ठरला. या अव्वल कामगिरीच्या बळावर त्याने भारतीय संघाकडून शानदार विजयी सलामी दिली. याशिवाय त्याने अापल्या पदकाचा अाशाही पल्लवित केल्या. भारताच्या २५ वर्षीय राेअर दत्तूने शनिवारी एकेरीच्या स्कल्स प्रकाराच्या पहिल्याच हिटमध्ये तिसरे स्थान गाठलेे. त्याने पहिल्याच हिटमध्ये ७:२१.६७ सेकंदात अंतर पूर्ण केले. यामुळे त्याला या हिटमध्ये अापले तिसरे स्थान निश्चित केलेे. या गटात क्युबाचा एंजेल राेड्रिग्ज हा अव्वल स्थानावर राहिला. ताे या पहिल्या हिटमध्ये वरचढ ठरला. त्याने ७:०६.८९ सेकंदात निश्चित अंतर पूर्ण करताना अव्वल स्थानावर धडक मारली.

दाेन वेळचा राष्ट्रीय राेइंग स्पर्धेतील चॅम्पियन दत्तू भाेकनळने शनिवारी राेइंगमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या प्रकारात अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ताे एकमेव भारतीय अाहे. त्यामुळे त्याच्याकडून अव्वल कामगिरीसाठी सर्वांच्या अाशा अाहेत. याच विश्वासाला सार्थकी लावताना त्याने पहिल्याच दिवशी अव्वल कामगिरी केली.

त्यापे पहिल्या ५०० मीटरच्या अंतरात दुसरे स्थान गाठले हाेते. त्याने मेक्सिकाेच्या जुअानला सहज मागे टाकून हे स्थान पटकावले. मात्र, पिछाडीवर पडलेल्या जुअानने अवघ्या १३ सेकंदात अाघाडी घेतली. त्यामुळे दत्तु हा तिसऱ्या स्थानावर राहिला. दत्तूने एकूणच चमकदार कामगिरी केली.

एकूण सहा हिट
राेइंगच्या एकेरी स्कल्समध्ये एकूण सहा हिट हाेतात. यातील प्रत्येक हिटमध्ये सहा राेअरचा समावेश असताे. यामधील अव्वल तीन खेळाडूंना अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित करता येताे. अशाप्रकारे सहा हिटमधील १८ खेळाडू हे उपांत्यपूर्व फेरीत दाखल हाेतात. या सर्व खेळाडूंच्या एकूण तीन हिट हाेतात. यातील अव्वल तीन राेअर हे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात.

अाज उपांत्य फेरीची संधी
नाशिकच्या दत्तूला एकेरी स्कल्सच्या उपांत्य फेरीपर्यंतचा पल्ला यशस्वीपणे गाठण्याची संधी अाहे. रविवारी या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतील हिट हाेणार अाहेत. यातील अव्वल कामगिरीच्या बळावर दत्तू हा अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करू शकताे. यासाठी त्याला काैशल्य पणाला लावावे लागेल.
पुढे वाचा...
टेबल टेनिस: मौमा दास, मनिका बत्राचा पराभव
टेनिस: पेस-बोपन्ना पहिल्याच फेरीत गारद
नेमबाजी: जितू फायनलमध्ये
बातम्या आणखी आहेत...