आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपिंदरचे दोन गोल; भारताचा १२ वर्षांनंतर अाॅलिम्पिकमध्ये विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिअाे -अाठ वेळच्या चॅम्पियन भारतीय हाॅकी संघाची दीर्घ प्रतिक्षेनंतर तपश्चर्या फळला अाली. भारतीय संघाने १२ वर्षानहतर अाॅलिम्पिक स्पर्धेत शानदार विजयी संपादन केला. रूपिंदरपाल सिंगने (२७, ४९ मि.) गाेलचा डबल धमाका उडवून भारतीय हाॅकी संघाचा विजय निश्चित केला. भारताने सलामी सामन्यात अायर्लंडवर ३-२ असा विजय मिळवला. व्ही. अार. रघुनाथनेही (१५ मि.) संघाच्या विजयात एका गाेलचे याेगदान दिले. अायर्लंडकडून जेर्मन (४५ मि.) अाणि काेनार हार्टने (५६ मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. मात्र, त्यांना टीमचा पराभव टाळता अाला नाही. या विजयाच्या बळावर भारतीय संघाने ब गटाच्या गुणतालिकेत ३ गुणांसह अव्वल स्थानावर धडक मारली. भारताने ब गटातील पहिला सामना जिंकून अाॅलिम्पिकमधील माेहिमेला दमदार सुरुवात केली. अाता भारतीय संघाचा स्पर्धेतील दुसरा सामना साेमवारी बलाढ्य जर्मनीविरुद्ध हाेणार अाहे.

गाेलरक्षक श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदा रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत अापले नशिब अाजमावत अाहे. चॅम्पियन्स ट्राॅफीतील राैप्यपदकाने अात्मविश्वास द्विगुणीत झालेल्या भारतीय संघाने सामन्यात दमदार सुरुवात केली. अवघ्या १५ मिनिटांत भारताला १-० ने अाघाडी घेता अाली. रघूनाथने भारताकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या १२ मिनिटांत रुपिंदर पालने भारताची २-० ने अाघाडी निश्चित केली. त्यानंतर अायर्लंडने ४५ व्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले. मात्र, त्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत रुपिंदरपालसिंगने वैयक्तिक दुसरा अाणि भारताकडून तिसरा गाेल केला. त्यानंतर पिछाडीवर पडलेल्या अायर्लंडने ५६ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, त्यानंतर या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

बेल्जियमची इंग्लंड टीमवर मात: अ गटातील सलामीला बेल्जियमने शनिवारी इंग्लंडवर ४-१ ने मात केली. तसेच ब गटात अर्जेटिना व हाॅलंड सामना ३-३ ने बराेबरीत राहिला.
भारतीय महिलासमाेर अाज जपान : तब्बल ३६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रचंड मेहनतीच्या बळावर अाॅलिम्पिकचे तिकीट संपादन करणारा भारतीय महिला हाॅकी संघ दमदार विजयासाठी सज्ज झाला अाहे. महिला संघ रिअाे अाॅलिम्पिकमधील अापल्या माेहिमेला रविवारी जपानविरुद्ध सामन्यातून सुरुवात करणार अाहे. सुशीला चानूच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ शानदार विजयी सलामीसाठी उत्सुक अाहे. ब गटातील हे दाेन्ही संघ उद्या समाेरासमाेर असतील. गत १९८० नंतर प्रथमच भारतीय महिला हाॅकी संघ अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरला अाहे.
रूपिंदर ठरला हीराे
युवा स्टार रूपिंदरपाल सिंग हा शनिवारी अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाच्या विजयाता हीराे ठरला. त्याने अापल्या अव्वल कामगिरीच्या बळावर टीमचा विजय निश्चित केला. याशिवाय अापल्या नावे दाेन गाेलची नाेंद केली. त्याने सामन्यात दाेन गाेल करून विजयात माेलाचे याेगदान दिले. अाता अागामी जर्मनीविरुद्ध सामन्यातही अव्वल कामगिरीची लय कायम ठेवण्याचा रुपिंदरपाल सिंगचा प्रयत्न असेल.
छायाचित्र : गाेल केल्यानंतर रूपिंदरपालचे अभिनंदन करताना भारताचे खेळाडू.
बातम्या आणखी आहेत...