आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोइंग : नाशिकचा दत्तू उपांत्यपूर्व फेरीमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - अॉलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. अनेक खेळाडू पात्र फेरीतच गारद झाले, तर अनेकांनी मुख्य फेरीसाठी पात्रता मिळवली. नाशिकचा अार्मी मॅन दत्तू भाेकनळ महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आला.

यांच्याकडून आशा
राेइंग : दत्तूने शनिवारी एकेरीच्या स्कल्स प्रकाराच्या पहिल्याच हिटमध्ये तिसरे स्थान गाठले.
हाॅकी : पुरुष हाॅकी संघाने आयर्लंडला ३-२ने हरवले. आॅलिम्पिकमध्ये हा १२ वर्षांत पहिलाच विजय. भारत २००८ मध्ये पात्रच नव्हता, २०१२ मध्ये एकही सामना जिंकला नव्हता.
यांच्याकडून निराशा
टेनिस : पुरुष दुहेरीत पदकाचे दावेदार लिएंडर पेस व रोहन बाेपन्ना पहिल्या फेरीत पोलंडकडून गारद झाले.
नेमबाजी : नेमबाज अपूर्वी चंदेला व अायाेनिका पाॅल अपयशी ठरल्या. जितू राय १० मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत पराभूत झाला.
टेबल टेनिस : मौसा दास व मनिका बत्राला पराभवाचा सामना करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...