आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RIO: बीजिंगमध्ये 3, लंडनमध्ये 6 तर आता रिओत भारताला 12 पदाकाची आशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ  ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे 4.30 वाजता सुरु होईल. - Divya Marathi
रिओ ऑलिंपिकचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे 4.30 वाजता सुरु होईल.
रिओ डी जेनेरियो- ऑलिंपिकचा सोहळा काही तासांवर आला असून, भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे 4.30 वाजता याला सुरुवात होईल. या दिवशी शूटिंग, हॉकीसह भारताचे अनेक लढती आहेत. बीजिंगमध्ये भारताने 3, लंडनमध्ये 6 मेडल जिंकली होती. यंदा भारत 12 पदके जिंकेल अशी अपेक्षा आहे. दूरदर्शनसह स्टार स्पोर्ट्सवर ऑलिपिंकचे लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. 17 दिवसांपर्यंत 205 देशांतील 10239 खेळाडू 28 क्रीडा प्रकारांत 306 सुवर्णपदकांसाठी झुंजतील. भारताचे 119 खेळाडू 15 गेम्समध्ये सहभागी होणार...
- भारताचे 119 खेळाडू 15 गेम्समध्ये सहभागी होतील.
- भारताचे ऑलिंपिकमधील हे सर्वात मोठे पथक आहे. लंडन गेम्स (2012) मध्ये 83 खेळाडू गेले होते.
- भारतीय पथकात 56 महिला खेळाडू आहेत. ज्यातील 5 पदकाच्या दावेदार मानल्या जात आहेत.
- भारताच्या दृष्टीने 6, 7, 8, 12, 13, 15, 17, 18, 19, 21 ऑगस्ट हे दिवस महत्त्वाचे आहेत.
- 19 ऑगस्टला आपल्याला समजेल नरसिंग यादवची जादू चालली की नाही ते.
- भारताला ज्या क्रीडा प्रकारात पदकाची आशा आहे त्यात शूटिंग, तिरंदाजी, रेसलिंग, बॉक्सिंग, बॅडमिंटन आणि टेनिस याचा समावेश आहे. - परेडमध्ये भारताचा 95 वा नंबर आहे. भारताचा ध्वज अभिनव बिंद्रा (शुटिंग) उंचावेल.
या दिवशी, या खेळाडूंवर राहील जगाची नजर-
# 13-14 ऑगस्ट: 100 मीटर धावणे रेस. उसेन बोल्ट हारणार की नवा विक्रम करणार.
# 9, 10 ऑगस्ट: स्वीमिंग- निवृत्तीनंतर पुन्हा परतलेला मायकल फेल्प्स गोल्ड जिंकणार की मोकळ्या हाताने परतणार.
# फेल्प्सने आतापर्यंत स्वीमिंगमध्ये 18 गोल्डसह 22 मेडल जिंकली आहेत. ऑलिंपिकमध्ये एखाद्या खेळाडूने जिंकलेली ही सर्वात जास्त पदके आहेत.
अमेरिका - चीनमध्ये सर्वात पुढे राहण्याची स्पर्धा
# लंडन ऑलिंपिक (2012) मध्ये 46 सुवर्णपदकांसह 103 पदके जिंकून अमेरिका पहिल्या क्रमांकावर होती.
# 38 पदकांसह चीन दुस-या क्रमांकावर होता.
# बीजिंग ऑलिम्पिकमध्ये (2008) 51 सुवर्ण 100 पदके जिंकून चीन पहिल्या क्रमांकावर होता.
# 36 सुवर्णासह 110 पदके जिंकून अमेरिका दुस-या क्रमांकावर होती.
अमेरिकेचे 1000 व्या गोल्डवर नजर
# अमेरिकेची 1000 व्या गोल्डवर नजर असेल. अमेरिकेने आतापर्यंत 976 गोल्ड जिंकत पहिल्या स्थानावर आहे. भारत 51 व्या नंबरवर आहे.
# ऑलिंपिकमध्ये उद्घाटन सोहळ्यावर 2.1 कोटी डॉलर खर्च होणार आहेत.
# चार वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये 4.2 कोटी डॉलर खर्च झाले होते.
# या वेळी उद्घाटन समारंभाचा संदेश 'निरंतरता, ब्राझिली लोकांचे हास्य आणि भविष्याची आशा' असेल.
पुढे वाचा, जगाचे व भारतीयांचे या प्रमुख खेळाडूवर आहे लक्ष....
तसेच वाचा, लिअॅंडर पेसला रिओमध्ये मिळाली नाही रूम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...