आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑलिम्पिक: नेमबाजीत जितूवर नजरा; प्रार्थना सानियासह खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - रिओ ऑलिम्पिकमध्ये शनिवारी भारताचे पदकाचे खाते उघडू शकते. नेमबाजीत दोन प्रकारांत चार भारतीय नेमबाज नेम साधतील. अपूर्वी चंदेला आणि अायोनिका पॉल महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात, तर जितू रॉय आणि गुरप्रीत सिंग पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात नेम साधून पदकाचे प्रयत्न करतील.

तिकडे टेनिसमध्ये भारतीय खेळाडू आपल्या प्रवासाला सुरुवात करतील. लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांची जोडी पुरुष दुहेरीत, तर सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे यांची जोडी महिला दुहेरीत खेळेल. हॉकीतही पुरुष हॉकी संघ शनिवारी आयर्लंडसोबत आपला पहिला सामना खेळेल. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू दम दाखवेल. भारतीय पुरुष हॉकी संघ सुद्धा शनिवारी आॅलिम्पिक अभियानाला सुरुवात करेल. भारताला आयर्लंडशी दोन हात करायचे आहे.

भारोत्तोलनात राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या मीराबाई चानूकडून आशा
४८ किलो वजन गटात शैखोम मीराबाई चानू खेळेल. ट्रायलच्या वेळी तिने राष्ट्रीय विक्रम मोडताना १९२ किलो वजन उचलून रिओ ऑलिम्पिक क्वालिफाय केले होते. चानूने या वर्षी द. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
बातम्या आणखी आहेत...