आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ऑम्लिपिक: अतानूला पाचवे रँकिंग; तर दीपिका २० व्या स्थानावर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - ३१व्या ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत विक्रमापासून सुरुवात झाली. शुक्रवारी उद््घाटनाच्या आधी रँकिंग राउंड झाले. कोरियन तिरंदाज किम वुिजनने ७२० पैकी ७०० गुण मिळवून विश्वविक्रम केला. भारताच्या अतानू दासने शानदार कामगिरी करताना पाचवे स्थान मिळवले. तर महिला गटात दीपिकाकुमारीने २० वे स्थान पटकावले. महिला संघाने एकूण सातवे स्थान मिळवले. बंगालच्या अतानू दासची वर्ल्ड रँकिंग २२ आहे. त्याने अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करताना ७२० पैकी ६८३ गुण मिळवले. त्याने १७ परफेक्ट टेन आणि २० परफेक्ट शॉट मारले. अतानू ७२ शॉटच्या राउंडमध्ये अखेरच्या तीन शॉटपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, ७१ आणि ७२ व्या शॉटमध्ये त्याने गुणांवर शॉट मारला.

नेपाळच्या जीतसोबत सामना
शानदाररँकिंगमुळे अतानूला सोपा ड्रॉ मिळाला. त्याला ऑगस्ट रेाजी पहिल्या फेरीत ६० व्या रँकिंगच्या नेपाळच्या जीतबहादूर मुक्तानशी लढायचे आहे. अतानूसाठी ही लढत तुलनेने सोपी आहे.

रँकिंग राउंडचे टॉप-५
*किम वुजिन
गुण-७००(द.कोरिया)
*ब्रॅडी एलिसन
गुण-६९०(अमेरिका)
*डेव्हिड पस्कुआलुकी
गुण-६८५(इटली)
*जेफ वंडरवर्ग
गुण-६८४(हॉलंड)
*अतानू दास
गुण-६८३(भारत)
2012 चा विक्रम ब्रेक
२०१२ चा विक्रम ब्रेक वुजिननेशुक्रवारी अापल्याच देशाच्या डाेंगचा विक्रम ब्रेक केला. यापूर्वी ६९९ गुणांचा विश्वविक्रम हाेता, हा विक्रम इम डाेंग ह्युनने २०१२ च्या लंडन अाॅलिम्पिकमध्ये केला हाेता. आता चार वर्षांनंतर वुजिनने नवा विक्रम केला.
दीपिका आघाडी कायम ठेवण्यात अपयशी
भारतीयमहिला तिरंदाज दीपिकाकुमारी सुरुवातीची आघाडी कायम ठेवू शकली नाही. दीपिकाकुमारी ६४० गुणांसह २० व्या स्थानी राहिली. एकवेळ ती टॉप-५ मध्ये होती. मात्र, सातव्या फेरीत एक शॉट मिस केल्यानंतर ती टॉप-१० बाहेर झाली. तिने १० परफेक्ट १० शॉट मारले. बोम्बयल्या देवीने ६३८ स्थानासह २४ वे, लक्ष्मीराणीने ६१४ गुणांसह ४३ वे स्थान गाठले. दीपिकाला पुढच्या फेरीत जॉर्जियाच्या क्रिस्टिन एसेबुआशी लढायचे आहे. तर बोम्बयल्या ऑस्ट्रियाच्या लॉरेन्स बल्डाऊफशी आणि लक्ष्मीराणी स्लोव्हाकियाच्या लोंगोवाशी लढेल.
उपांत्यपूर्वचाप्रवेश हुकला, काेलंबियासाेबत खेळणार
टीमने१८९२ गुणांसह सातवे स्थान पटकावले. टाॅप-४ मुळे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला असता. मात्र, भारतीय महिला संघाला प्री-क्वार्टरमध्ये काेलंबिया संघाविरुद्ध खेळावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...