आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरणात विश्वविक्रम, व्हिएतनामने इतिहास रचला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- रिओ ऑलिम्पिकमध्ये शनिवारी जलतरणात तीन जागतिक विक्रम नोंदवले गेले, तर हुआंग झुआन विन्हने १० मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकत व्हिएतनामला ऑलिम्पिकमध्ये प्रथमच पदक मिळवून दिले. आॅस्ट्रेलियाच्या महिला रिले संघाने बाय १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये ३०.६५ सेकंदांसह विक्रमाची नोंद केली. पुरुष गटाच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक्समध्ये ब्रिटनच्या अॅडम पेटीने ५७.५५ सेकंदांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याने स्वत:चाच ५७.९२ सेकंदांचा विक्रम मोडला.

पुरुष गटाच्या ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मॅक हॉर्टनने ३.४१.५५ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. दोन वेळचा ऑलिम्पिकपदक विजेता चीनचा सून यांग दुसऱ्या स्थानी राहिला. दरम्यान, हॉर्टनने सून यांगला स्पर्धेदरम्यान ‘ड्रग चिटर’ म्हणून डिवचले. मादक द्रव्य बाळगल्याप्रकरणी सून यांगला मागच्या वर्षी अटक झाली होती. पाच वेळची चॅम्पियन असलेल्या हंगेरीच्या कतिन्का होसूनेही सुवर्णपदक जिंकले. तिने ४०० मीटर वैयक्तिक मेडले स्पर्धा अवघ्या ४.२६.३६ मिनिटांत जिंकून विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी चीनच्या ये शिवेनने लंडन ऑलिम्पिक्समध्ये ४.२८.४३ मिनिटांची विक्रमी वेळ नोंदवली होती.

व्हिएतनाम आणि थायलंडने ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक मिळवले. अमेरिका आणि जपानने यंदाही पदकतालिकेच्या अव्वल स्थानासाठी घोडदौड सुरू केली आहे. दोन्ही संघांनी पहिल्याच दिवशी प्रत्येकी पदके जिंकली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. या दोन सुवर्णांसोबत एकूण तीन पदकांसह ऑस्ट्रेलियाने क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.
आॅलिम्पिकमध्ये प्रथमच निर्वासितांच्या संघाचा समावेश करण्यात आला आहे. या संघातील खेळाडू यूसरा मर्दिनीने शनिवारी जलतरणासाठी तलावात उतरताच एक नवा अध्याय लिहिला. सिरीयातून बोटीने ग्रीसकडे पळून जात असतानाच यूसरा आणि तीची बहिण बसलेली नौका बुडाली. दोघींनीही पाण्यात उडी घेतली आणि बुडालेली बोट नीट करून तब्बल तास ती चालवत २० लोकांचे प्राण वाचवले. अशा संघर्षाला तोंड देत ऑलिम्पिकपर्यंत पोहोचलेल्या यूसराने शनिवारी १०० मीटर फ्रिस्टाइलमध्ये ४१ वे स्थान मिळवले. मात्र, उपस्थितांची मने जिंकण्यात तीच खरी अव्वल ठरली.

यजमान ब्राझीलच्या महिला फुटबॉल संघाने आपल्या घरच्या मैदानावर स्वीडनला पराभूत करून सलग दुसऱ्या विजय मिळवला. ब्राझीलने हा सामना ५-१ ने जिंकत, आपल्या गट मध्ये ब्राझील संघ अव्वल स्थानावर गाठले. ब्राझीलकडून मार्टा, बिर्याटिज, क्रिस्टियाने यांनी शानदार गोल केले. दुसरीकडे कर्णधार कार्ली लियोडच्या गोलच्या बळावर अमेरिकाने फ्रासला १-० ने परभूत केले. अमेरिका जी गटात सहा गुणांसह प्रथम स्थानवर पोहोचला. त्यानंतर फ्रास आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी गुण आहेत.

रशियन खेळाडूंच्या मागे डाेपिंगचा सुरू असलेला ससेमिरा अद्यापही कायम असल्याचे चित्र अाहे. रिअाेत अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी दाखल झालेले रशियन खेळाडू पुन्हा एकदा संशयाच्या भाेवऱ्यात सापडले. त्यामुळे जागतिक डाेपिंग विराेधी संस्थेने रशियाच्या तब्बल २०० खेळाडूंची डाेप टेस्ट केली, अशी माहिती संस्थने दिली. रशियाचे एकूण २७९ खेळाडू यंदा रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले अाहेत. यातील २०० खेळाडूंवर संशय व्यक्त करण्यात अाला. त्यामुळे या सर्व खेळाडूंची डाेप टेस्ट करण्यात अाली.

अॅडमचा पारणे फेडणारा विक्रम
ऑलिम्पिक पदार्पणात अॅडम पिटी या ब्रिटनच्या जलतरणपटूने ५७.५५ सेकंदांत १०० मीटरचे अंतर पार करून विक्रमाची नोंद केली. पुरुषांच्या १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक हिट्सच्या त्याची ही कामगिरी ‘याचि देही याचि डोळा’ पाहणाऱ्यांना थक्क करून गेली. डोळ्यांचे पाते लवते लवते तोच त्याने हा जागतिक कीर्तिमान रचला.

विन्हचे सुवर्ण, व्हिएतनाम झोतात
१० मीटर एअर पिस्टल प्रकारात हुआंग झुआन विन्हने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. अशा प्रकारची कामगिरी करणारा तो व्हिएतनामचा पहिला खेळाडू ठरला आहे. व्हिएतनमाच्या इतिहासातील पहिले सुवर्णपदक जिंकल्याचा मला सार्थ अभिमान असल्याची भावना ४१ वर्षीय नेमबाज हुआंगने व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...