आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rio Olympics 2016: Russia Claims First Medal As Beslan Mudranov Wins In Judo

डागाळलेल्या रशियाला सोनेरी मुलामा; ज्युदाेत बेसलन मुडरानाेवने पटकावले सुवर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - डाेपिंगमधील सहभागाने रशियन संघाची प्रतिमा माेठ्या प्रमाणात मलिन झाली अाहे. विविध अांतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या सर्वच खेळाडूंना संशयाच्या नजरेतून पाहिले जाते. मात्र, हीच डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काही रिअल हीराे जिवाची बाजी लावताना दिसत अाहेत. त्यांचा उद्देश देशाला नव्याने एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा अाहे. असाच रशियाचा एक रिअल हीराे रविवारी रिअाे अाॅलिम्पिकमध्ये चमकला. बेसलन मुडरानाेव असे या रशियाच्या हीराेचे नाव अाहे. त्याने ज्युदाे प्रकारात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.
येल्दाेसला १०-० ने धूळ चारली
रशियाच्या ३० वर्षीय बेसलन मुडरानाेवने ज्युदाेत पुरुषांच्या ६० किलाे वजन गटात अापले काैशल्य पणाला लावले. त्याने सरस खेळीच्या बळावर पहिल्या फेरीपासून सुरू केलेली विजयी माेहीम फायनलपर्यंत कायम ठेवली. त्याने फायनलमध्ये कझाकिस्तानच्या येल्दाेस समेताेला पराभूत केले. त्याने १०-० ने एकतर्फी विजय साकारला. याच्या बळावर रशियाचा मुडरानाेव हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने फायनल जिंकून रशियाच्या प्रतिमेला साेनेरी मुलामा दिला. त्याच्या या कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवल्या गेला.

नवीन प्रतिष्ठा मिळेल
मागील काही दिवसांपासून डाेपिंगसारख्या घटनांमुळे अामच्या देशाची माेठी मानहानी झाली अाहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला माेठा डाग लागला अाहे. मात्र, हीच मलिन प्रतिमा दूर करून नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याचा खेळाडूंचा प्रयत्न असेल. त्यासाठी मी जिंकलेले सुवर्णपदक महत्त्वाची भूमिका बजावेल,’ अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेत्या मुडरानाेवने दिली.
राष्ट्रगीतासह ध्वज डाैलाने फडकला
डाेपिंगमुळे प्रचंड मानहानी झालेल्या रशियाचा ध्वज अखेर डाैलाने स्पर्धेच्या तिसऱ्याच दिवशी फडकला. मुडरानाेवने मिळवलेल्या साेेनेरी यशामुळे हा मान मिळाला. पदक वितरण साेहळ्यादरम्यान मुडरानाेवचा मान्यवरांच्या हस्ते गाैरव हाेत असतानाच दुसरीकडे रशियाचा ध्वज उंचावून राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात अाली. यामुळे दिवसभर त्याच्या कामगिरीची चर्चा हाेती.
बातम्या आणखी आहेत...