आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अापली प्रतिष्ठा राखली; अमेरिकेला बनवले चॅम्पियन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅलिम्पिकमध्ये पुरुष अाणि महिलांसाठी पदके ही सारखीच असतात. मात्र, महिला खेळाडूंच्या सरस कामगिरीच्या बळावर पदकतालिकेत त्याच देशांनी वर्चस्व प्रस्थापित केले. सिंधू अाणि साक्षी मलिकने पदकतालिकेत देशाला स्थान मिळवून दिले. अमेरिकेला पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवून देण्यात महिला खेळाडूंची भूमिका महत्त्वाची ठरली. अमेरिकेच्या महिलांनी ५४ पदके जिंकली. यात २४ सुवर्ण, १७ राैप्य व १३ कांस्यचा समावेश अाहे. अमेरिकेच्या १०५ पदकांच्या तुलनेत महिला पदक विजेत्यांची संख्या ५४ टक्के अाहे. पदकतालिकेतील अव्वल देशांच्या कामगिरीतही त्या देशांच्या महिला खेळाडूंचे माेलाचे याेगदान ठरले.

११ देशांच्या महिलांना जिंकले सुवर्ण
देशाला पहिले अाॅलिम्पिक पदक मिळवून देण्यात प्युर्ताेरिकाेची टेनिसपटू माेनिका, काेसाेवाची ज्युदाेपटू माजलिंडा, बहामासची शाैनी मिलर (४०० मी. रेस), तैवानची वेटलिफ्टर चिंग सू, बहरिनची धावपटू रुथ जाबेत (३ हजार मी. स्टिपलचेस), राेमानियाची तिरंदाज टीम, इथिअोपियाची धावपटू अल्माज अयाना (१० हजार मी. रेस), इंडाेनेशियाची बॅडमिंटनपटू नात्सिर (मिश्र दुहेरी), स्लाेव्हानियाची ज्युदाेपटू टीना, स्वीडनची जलतरणपटू सराह जाेस्ट्राेम, डेन्मार्कची पेर्निल ब्लूमचा समावेश अाहे.

जिम्नॅस्टिकमध्ये अमेरिकेचा दबदबा
जलतरण, जिम्नॅस्टिक व अॅथलेटिक्समध्ये अमेरिकन महिलांनी दबदबा निर्माण केला. अमेरिकन खेळाडूंनी जलतरणात १६ पैकी ८ सुवर्णपदके जिंकली. जिम्नॅस्टिकमध्ये ६ पैकी ४ सुवर्ण मिळवली. अॅथलेटिक्समध्ये अमेरिकन महिलांनी २० पैकी ५ सुवर्णपदके अापल्या नावे केली.

डायव्हिंग, वेटलिफ्टिंगमध्ये चीन अव्वल
चीन संघ गत अाॅलिम्पिकमध्ये दुसऱ्या स्थानावर हाेता. अाता चीनची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. मात्र, तरीही चीनच्या महिलांनी डायव्हिंग, टेबल टेनिस अाणि वेटलिफ्टिंगमध्ये अापले वर्चस्व अबाधित ठेवले. डायव्हिंग अाणि टेबल टेनिसच्या महिला गटात चीनने दाेन सुवर्ण, वेटलिफ्टिंगच्या महिला गटात ७ पैकी ३ सुवर्णपदके जिंकली अाहेत.

तिरंदाजीत दक्षिण काेरिया अव्वल
अाॅलिम्पिकमधील तिरंदाजी खेळ प्रकारात दक्षिण काेरियन महिला वरचढ ठरल्या. काेरियाच्या महिलांनी दाेन सुवर्ण अाणि एक कांस्यपदक अापल्या नावे केले. पुुरुष गटातील दाेन्ही सुवर्णही काेरियाने जिंकली.

सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणारी महिला
अमेरिकन जलतरणपटू केटी लेडेकी व जिम्नॅस्ट सिमाेनने प्रत्येकी चार सुवर्णसह एकूण पाच पदके जिंकली अाहेत. हंगेरीची जलतरणपटू हाेत्स्जुने ३ सुवर्ण व १ राैप्य जिंकले.अमेरिकेच्या सिमाेन, मेडेलाईन व जमैकाची धावपटू थाॅम्पसनसह ९ महिलांनी प्रत्येकी २ सुवर्णपदके पटकावली अाहेत.
बातम्या आणखी आहेत...