आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

600 छायाचित्रकारांनी वेगवेगळ्या अँगलने टिपली 100 मीटरची शर्यत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे हे अाजपर्यंतचे सर्वाधिक ‘व्हिज्युअल’ अाॅलिम्पिक ठरले अाहे. कारण अाहे त्याची वेगवेगळ्या अँगलने अालेली छायाचित्रे. जशी यापूर्वीच्या अाॅलिम्पिकमध्ये येऊ शकली नव्हती. रिअाेमध्ये पाेहाेचलेल्या १५०० नामांकित छायाचित्रकारांच्या माध्यमातूनच हे शक्य हाेऊ शकले अाहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे एकेका दिवसाच्या इव्हेंटचे हजाराे फाेटाे विश्वात झळकत अाहेत. जगभरातील चाहत्यांप्रमाणेच छायाचित्रकारांचाही अावडते इव्हेंट हे जलतरण अाणि अॅथलेटिक्स हाेते. एका संशाेधनानुसार अाॅलिम्पिकमधील सर्वाधिक महत्त्वाची मानली जाणारी १०० मीटरची शर्यत अाॅलिम्पिकनगरीतील ६०० छायाचित्रकारांनी कव्हर केली.
दरराेज सुमारे ८३ हजार छायाचित्रे
प्रत्येक छायाचित्रकार दिवसभरात काही हजार छायाचित्रे काढतात. त्यातून संबंधित संस्थांकडून अनेक छायाचित्रांची निवड केली जाते. मग ती छायाचित्रे प्रसिद्ध नियतकालिक किंवा साइटवर अपलाेड केली जातात. अशा छायाचित्रांची संख्या ८३ हजारांहून अधिक असते.
जलतरणाचे कव्हरेज राेबाेट कॅमेऱ्याने टिपले गेले
रिअाेमध्ये सर्वाधिक नवीन तंत्रज्ञानाचा उपयाेग करण्यात अाला अाहे. पाण्याखालील कव्हरेजसाठी राेबाेटिक कॅमेऱ्यांचा उपयाेग करण्यात अाला, तर अॅथलेटिक्ससाठी ३६० डिग्री अँगलच्या कॅमेऱ्यांचा उपयाेग करण्यात अाला. तसेच त्यासाेबतच रिमाेट कॅमेरेदेखील वापरण्यात अाले. राेबाेटिक कॅमेऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिक्स करून त्यानंतर त्यांना रिमाेट कंट्राेलने नियंत्रित केले जाते.
बाेल्टचा फाेटाे ५९ सेकंदांत झळकला
काेणत्याही छायाचित्रकाराला फाेटाे काढल्यानंतर ताे लाेड करायला किमान दाेन मिनिटांचा कालावधी लागताे. मात्र, १०० मीटर शर्यतीमध्ये बाेल्टचा फिनिशिंग पाॅइंटवरचा फाेटाे घेताच अवघ्या ५९ सेकंदांत ताे लाेड करून एजन्सीने ताे जगभरातील चाहत्यांना नेटवर उपलब्ध करून दिला. त्यासाठी एका छायाचित्र एजन्सीची फायबर अाॅप्टिकल केबल ९५ किलाेमीटर दूरवर असलेल्या त्यांच्या कार्यालयापर्यंत टाकण्यात अाली हाेती.
दाेन छायाचित्रांना जाेडून ‘स्मायलिंग पाेज’
बाेल्टची १०० मीटरची सेमीफायनल अाणि फेल्प्स व क्लाेजचा फाेटाे इंटरनेटवर सर्वाधिक व्हायरल झाला अाहे. अखेरच्या २० मीटरच्या टप्प्यात असतानाची ‘स्मायलिंग पाेज’ ही दाेन छायाचित्रांच्या मिश्रणातून साकारण्यात अाली अाहे. एकाच वेळी वेगवगेळ्या स्थानांवर असलेल्या दाेन छायाचित्रकारांनी हे फाेटाे काढले असून ते एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळले हाेते.
पुढे पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...