आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधू ठरणार सुवर्ण वा रौप्यपदक जिंकणारी देशाची पहिली महिला, समोर आहे नंबर 1चे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - भारताला सलग दुसऱ्या दिवशी असलेली पदकाची अाशा अखेर फलद्रूप झाली. पी. व्ही. सिंधूने उपांत्य सामन्यात तिची जपानी प्रतिस्पर्धी नोजुमी अाेकुहारावर सलग २ गेममध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली अाहे. त्यामुळे अाता सिंधूच्या नावे पदक निश्चित झाले अाहे.

सिंधूने सलग दाेन गेममध्ये हा सामना २१-१९, २१-१० असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तर सिंधूने १०-१० पासून सलग ११ गुण मिळवत सामना २१-१० असा अारामात खिशात घालत थेट फायनल गाठली अाहे.

पहिल्या गेममध्ये बाजी
पहिल्या गेममध्ये प्रारंभापासूनच सिंधूने अाघाडी घेतली हाेती. सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर सिंधूने लागाेपाठ गुण घेत ४-१ अशी अाघाडी घेतली. ही अाघाडी सिंधूने ६-११ पर्यंत वाढवत नेली. त्यानंतर काेर्टबदल झाल्यावर मात्र अाेकुहाराने गेममध्ये कमबॅक करीत अाघाडी ११-८ ने कमी केली. त्यानंतर १५-१२ पर्यंत ही अाघाडी कायम राहिली. परंतु १९-१७ पर्यंत सामना गेल्याने पहिला गेम अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत पाेहाेचला. अखेरीस तर २०-१९ असा गेमपाॅइंट अाल्यावर जाेरदार स्मॅशवर गुण वसूल करीत सिंधूने पहिला गेम जिंकला.

दुसरा गेम प्रचंड चुरशीचा
पहिल्या गेमपेक्षाही दाेन्ही खेळाडू अधिक अाक्रमकपणे खेळू लागल्याने दुसरा गेम प्रचंड चुरशीचा झाला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने अाघाडी घेतली हाेती. मात्र सिंधू ३ -० वर असताना अाेकुहाराने सलग ५ गुण घेत ३-५ अशी अाघाडी मिळवली. त्यानंतर तर क्षणाेक्षणी कधी सिंधू पुढे, तर कधी अाेकुहारा एका गुणाने पुढे अशी चुरस रंगली हाेती. त्यानंतर ५-५, ७-७, ८-८, ९-९ अशी बराेबरी झाल्यानंतर सामना अत्यंत उत्कंठावर्धक स्थितीत पाेहाेचला. त्यानंतर सिंधूने सलग गुण जिंकत अाेकुहारावर १५-१० असे सामन्यात वर्चस्व मिळवले.

अाेकुहाराविरुद्धचे ट्रॅक रेकाॅर्ड : जपानची अाेकुहारा नाेझाेमाेविरुद्ध सिंधू चार वेळा लढली हाेती. मात्र, त्यापैकी केवळ एकदाच तेदेखील २०१२ मध्ये १९ वर्षांखालील गटात खेळताना सिंधूने तिला पराभूत केले हाेते. त्यानंतर गत तीन वर्षे म्हणजेच २०१४, २०१५ अाणि २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूला पराभव पत्करावा लागला हाेता.

पिवळ्या रंगाची अावड : सिंधूला पिवळा रंग अावडताे, त्यामुळे ती पिवळ्या रंगाचा ड्रेस घालण्यालाच प्राधान्य देते. त्याप्रमाणेच उद्याच्या पदकांमध्ये चाॅइस विचारल्यावरही तिने पिवळ्या धमक रंगाचे ‘सुवर्ण’पदक पटकावण्याचेच ध्येय असल्याचे सिंधूने मुलाखतीत नमूद केले. उपांत्य फेरीची ही लढत पदकासाठी असल्याने दोघींसाठी सर्वाधिक प्रतिष्ठेची झाल्याचेही सिंधूने नमूद केले.

तीन पराभवांचा वचपा
अाशियाई चॅम्पियनशिपमध्ये अाेकुहाराविरुद्ध २०१४ पासून सलग तीन वर्षे सिंधूला पराभव पत्करावा लागला हाेता. त्या तीन पराभवांचा वचपा सिंधूने अाॅलिम्पिकमधील एकाच पराभवातून काढल्याची भावना बॅडमिंटनप्रेमींनी व्यक्त केली.
सिंधूची रिअाेमधील वाटचाल
पहिला सामना विजयी विरुद्ध मिशेल ली - २ -१ (कॅनडा)
प्री क्वार्टर फायनल विजयी विरुद्ध लाॅरा साराेसी - २ -० (हंगेरी)
क्वार्टर फायनल विजयी विरुद्ध तई त्झु यिंग - २- ० (तैपेइ)
सेमीफायनल विजयी विरुद्ध अाेकुहारा - २ - ० (जपान)

सर्वात कमी वयाची पदक विजेतीही ठरणार
पहिली भारतीय महिला
- जी ऑलिम्पिकमध्ये एखाद्या गेममध्ये रौप्य किंवा सुवर्ण जिंकेल. {जी सर्वात कमी वयात पदक जिंकेल. सिंधू २१ वर्षांची आहे.
दुसरी भारतीय महिला
- जी बॅडमिंटनमध्ये देशासाठी पदक जिंकेल. यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते.
तिसरी भारतीय महिला
- जी आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवेल. यापूर्वी मल्लेश्वरी आणि साक्षी मलिकने असे पदक जिंकले आहे.
पाचवी भारतीय महिला
- जी ऑलिम्पिक पदक जिंकेल. यापूर्वी सायना, मेरी कोम, कर्नाम मल्लेश्वरी आणि साक्षी मलिकने पदक जिंकले आहे.

नोझोमीने पहिल्या गेममध्ये मला जराही निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नव्हते. मी तिला कोर्टवर सतत धावायला लावून दमवित होते. ते डावपेच आज यशस्वी ठरले. पहिल्या गेममध्ये माझ्या अनफोर्स एरर पुष्कळ झाल्या. पण माझे प्रशिक्षक गोपीचंद यांनी सांगितले की, काळजी करू नको, नेटवरचे स्मॅश ती चांगले उचलत आहे. तेव्हा फटके मार आणि पुढे खेळत रहा. मला सुवर्णपदक खुणावत आहे. त्यामुळे मी सर्व शक्ती पणाला लावू खेळणार आहे. कॅरोलिनाविरूद्ध मी यापुर्वी खेळली असल्याने तिचा गेम मला माहिती आहे. अंतिम फेरीत प्रशिक्षक जे डावपेच ठरवतील, त्याप्रमाणे मी प्रत्यक्षात उतरविणार आहे. - पी.व्ही. सिंधू, भारतीय बॅडमिटनपटू

पदार्पणातच सिंधूची छाप
जागतिक स्पर्धेतील दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सिंधूने अापल्या पदार्पणातील अाॅॅलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरीची नाेंद केली. तिने उपांत्य सामन्यातील विजयासह विक्रमाची छाप पाडली. तिने अाॅलिम्पिकच्या अंतिम फेरीपर्यंतचा पल्ला गाठताना अव्वल खेळाडूंना धूळ चारली. त्यामुळे तिला अंतिम फेरी गाठता अाली.
चीनचे साम्राज्य भुईसपाट
मागील १६ वर्षांपासून अाॅलिम्पिकच्या बॅडमिंटनमध्ये असलेले चीन खेळाडूंचे साम्राज्य गुरुवारी भुईसपाट झाले. चीनची अव्वल महिला बॅडमिंटनपटू ली झुईरुईला उपांत्य सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यासह चीनची खेळाडू अाॅलिम्पिकमधून बाहेर पडली. चीनचे स्पर्धेतील अाव्हान १६ वर्षांनंतर संपुष्टात अाले.

पुढे वाचा, आज सायंकाळी फायनल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...