आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अँटी युनिफाॅर्म’ने झिकाचा धाेका दूर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - अाॅलिम्पिकचे नाव घेताच खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण हाेते. मात्र, अाता रिआेमध्ये दुसरीकडे चिंतेचे सावट निर्माण झाल्याचेही दिसत अाहे. कारण ब्राझीलमध्ये सध्या झिका नावाच्या व्हायरसने कहर केला अाहे. त्यामुळे झिकाच्या नुसत्या नावानेच अाता खेळाडूंच्या जिवाचा थरकाप उडत अाहे. मात्र, खेळाडूंच्या मनातील हीच भीती दूर करण्यासाठी दक्षिण काेरियाने नवा प्रभावी उपाय शाेधून काढला अाहे. काेरियाने डासांच्या मुक्तीसाठी ‘अँटी युनिफाॅर्म’ तयार केला अाहे. हा पाेशाख घातल्यानंतर खेळाडूंच्या मनातील झिकाची भीती अाता सहज दूर हाेणार अाहे. यातूनच या सर्व खेळाडूंना अापले निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी याेग्य प्रकारचे लक्ष्य केंद्रित करता येईल, असा विश्वासही काेरियाच्या वतीने व्यक्त करण्यात अाला.

काेरियन अाॅलिम्पिक समितीने याच अाठवड्यात या अँटी युनिफाॅर्मचे अनावरण केले. ‘या युनिफाॅर्ममध्ये एक लांब पॅन्ट, लांब स्लिव्ह शर्ट अाणि जॅकेटचा समावेश अाहे. या कपड्यामध्ये डासांना दूर पळवणारे असे प्रभावशाली रसायन वापरले अाहे. त्यामुळे अाता सर्वच सहभागी खेळाडू हाच पाेशाख घालून उद््घाटन अाणि समाराेपीय साेहळ्यामध्ये सहभागी हाेतील. मात्र, खेळादरम्यान खेळाडू मैदानावर अापल्याच जर्सीवर सहभागी हाेतील,’अशी माहिती काेरियन कमिटीच्या एका अधिकाऱ्याने दिली. खेळाडूंना डासांपासून मुक्तीसाठी अँटी मॉस्क्विटाेचाही वापर करू शकतात.

काेरियन शासन अाणि अाॅलिम्पिक समितीने गत एप्रिल महिन्यामध्ये ब्राझीलचा दाैरा केला. या वेळी या पथकाने स्थानिक रुग्णालयांनाही भेट दिली. त्यानंतरच हा पाेशाख तयार करण्याची संकल्पना अस्तित्वात अाली. अाता लवकरच हा युनिफाॅर्म वापरण्याचे अादेश खेळाडूंना मिळण्याची शक्यता अाहे. मात्र, याचदरम्यान व्हिएतनामने अापल्या खेळाडूंना अशा प्रकारचा पाेशाख उपलब्ध करून देण्यास मनाई केली आहे. ‘या ठिकाणी असलेल्या वातावरणानुसारच खेळाडूंना अाम्ही पाेशाख पुरवणार अाहाेत. अामच्यासाठी अॅटी युनिफार्म उपलब्ध करून देणे शक्य नाही,’ अशी माहिती व्हिएतनामच्या अाॅलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्याने दिली. झिकाच्या डासांमुळे सध्या विदेशासह स्थानिक खेळाडूदेखील त्रस्त अाहेत. त्यांनाही या डासांची भीती वाटत अाहे.
बातम्या आणखी आहेत...