आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीर भरकटले; रशियाकडून भारतीय महिलांचा ३-२ ने पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- दीपिका कुमारी,बोम्बल्या देवी आणि लक्ष्मीराणी यांच्या भारतीय महिला संघाचा तिरंदाजीच्या क्वार्टर फायनलमध्ये रशियाकडून ३-२ ने पराभव झाला. भारताने हा सामना शॉटऑफमध्ये २५-२३ ने गमावला. सामन्यातील पहिला सेट रशियाने ५५-४८ ने जिंकला. दुसरा सेट भारताने ५३-५२ असा एका गुणाच्या अंतराने जिंकला आणि २-२ अशी बरोबरी केली.

यानंतर तिसरा सेटही भारताने ५३-५० अशा फरकाने जिंकून ४-२ अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये रशियाने पुनरागमन केेले. रशियाने चौथा सेट ५५-५४ अशा एका फरकाने जिंकला. यानंतर दोन्ही संघांत ४-४ अशी बरोबरी झाली. यामुळे सामा शाॅटऑफमध्ये गेला. शॉटऑफमध्ये दोन्ही संघांच्या तिरंदाजांना आलटून पालटून तीर चालवावे लागतात. शॉटऑफमध्ये रशियाने १०, ६, असे बाण चालवताना २५ गुण मिळवले. तर भारताने ७, ८, असे बाण चालवून २३ चा स्कोअर केला. भारताने शॉटऑफमध्ये २५-२३ असा दोन गुणांनी पराभव स्वीकारला. या विजयासह रशियाने सेमीफायनल प्रवेश केला आहे.

साधारण कामगिरी
भारतीय महिला दीपिकाकुमारी, बोम्बल्या देवी आणि लक्ष्मीराणी यांनी अपेक्षेप्रमाणे साधारण कामगिरी केली. भारतीय तिरंदाजांचे बरेच बाण भरकटले. २७ शॉटपैकी भारतीय महिलांनी केवळ परफेक्ट टेनचा स्कोअर केला.

तत्पूर्वी, भारतीय महिला तिरंदाजी संघाने क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय त्रिकुटाने प्री क्वार्टर फायनलमध्ये कोलंबियाला ५-३ ने हरवले. या सामन्यात दोन्ही संघांच्या तिरंदाजांची कामगिरी अत्यंत साधारण ठरली. भारताने पहिला सेट ५२-५१ अशा अवघ्या गुणाने जिंकला. यात बोम्बल्या देवीने आणि १० चा नेम साधला. लक्ष्मीराणीचे दोन्ही तीर वरच लागले. दीपिकाने आणि चा स्कोअर केला. कोलंबियाच्या टीमने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करताना ५०-४९ ने विजय मिळवला होता.
बातम्या आणखी आहेत...