आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेमबाजी: हिना सिद्धूचे फायनल अवघ्या 4 गुणांनी हुकलेे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- नेमबाजीत भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी रविवारीसुद्धा कायम राहिली. महिलांच्या १० मी. एअर पिस्तूल प्रकारात पदकाचे आशास्थान असलेली भारताची हिना सिद्धू फायनलसाठी क्वालिफाय करू शकली नाही. ३८० गुणांसह तिने ४४ नेमबाजांत १४ वे स्थान गाठले. यासह ती पदकाच्या शर्यतीतूून बाहेर झाली. आठ नेमबाजांना फायनलमध्ये स्थान मिळाले. आठव्या स्थानी असलेल्या स्पेनच्या सोनिया फ्रँक्वेटने ३८४ गुणांसह फायनलमध्ये प्रवेश केला. यानुसार हिनाची अवघ्या गुणांनी फायनलची संधी हुकली. क्वालिफिकेशनमध्ये अव्वल दोन स्थानांवर रशियाच्या नेमबाजांनी स्थान मिळवले. वितालिना बातसारास्कितनाने ३९० गुणांसह अव्वल तर एकातेरिना कोर्शुनोवाने ३८३ गुणांसह दुसरे स्थान गाठले.
पात्रता फेरीत हिनाने पहिल्या सिरीजमध्ये ९४ चा स्कोअर केला. दुसऱ्या सिरीजमध्ये तिने ९५, तिसऱ्यात ९६ चा स्कोअर केला. फायनल प्रवेशासाठी चौथ्या सिरीजमध्ये हिनाला कमीत कमी ९९ गुणांची गरज होती. मात्र ९५ चा स्कोअर करू शकली. हिनाने १३ पैकी १० परफेक्ट टेन चा स्काेअर केला.

ट्रॅपमध्ये संधू, चेनाय यांची निराशा
भारतीयनेमबाज मानवजीत सिंग संधू आणि क्यानन चेनाय यांची पुरुषांच्या ट्रॅपमध्ये निराशाजनक प्रदर्शन करताना पहिल्या दिवशी अनुक्रमे १७ आणि १९ वे स्थान पटकावले. संधूने ६८ तर क्याननने ६७ चा स्कोअर केला. ३३ नेमबाजांचा समावेश असलेल्या स्पर्धेत पहिल्या दिवशी सर्व नेमबाजांना ७५ शॉट मिळाले. दुसऱ्या दिवशी नेमबाजांना आणखी २५ शॉटचे दोन राऊंड असे एकूण ५० शॉट मिळतील. पहिल्या दिवशी संधूने तीन फेरीत २३, २३, २२ तर क्याननने २२, २३, २२ असेगुण मिळवले.
बातम्या आणखी आहेत...