आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rio Olympics2016 Vins William Out Of The Olympics After Losing In The First Round

व्हीनस, इव्हानोविकचे सलामीला पॅकअप; सलामीला रदावांस्काचा पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- चारवेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स, पाेलंडची अग्निजस्का रदावांस्का अाणि माजी नंबर वन अॅना इव्हानाेविकला रविवारी िरअाे अाॅलिम्पिकमधून पॅकअप करावे लागले. या तिन्ही दिग्गज महिला खेळाडूंना टेनिसच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे महिला दुहेरीतील जगातील नंबर वन मार्टिना हिंगीसने विजयी सलामी दिली. मात्र, तिची सहकारी खेळाडू सानिया मिर्झाला पराभवाला सामाेरे जावे लागले. टेनिसमधील सलामीला युवा खेळाडूंनी सनसनाटी विजय संपादन करून स्पर्धेचा दिवस गाजवला.
झेंगचीरदावांस्कावर मात :जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या झेंग साईसाईने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत रदावांस्काला धूळ चारली. तिने सरळ दाेन सेटमध्ये ६-४, ७-५ ने सनसनाटी विजयाची नाेंद केली. दुसरीकडे अनपेक्षित पराभवामुळे रदावांस्काला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
सुअारेझकडूनइव्हानाेविकचा पराभव : कार्लासुअारेझने सलामी सामन्यात माजी नंबर वन अॅना इव्हानाेविकला पराभूत केले. तिने रंगतदार लढतीत २-६, ६-१, ६-२ ने विजय संपादन केला. पहिल्या सेटवर बाजी मारणाऱ्या अॅनाला दुसऱ्या अाणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये अपयशाला सामाेरे जावे लागले.
क्रिस्टेनविरुद्धव्हीनस पराभूत: जगातीलमाजी नंबर वन अाणि चार वेळची अाॅलिम्पिक चॅम्पियन व्हीनस विल्यम्स फार काळ अापले अाव्हान टिकवून ठेवू शकली नाही. तिला सलामीला क्रिस्टेन फ्लिपकेन्सने पराभूत केले. बेल्जियमच्या क्रिस्टेनने ४-६, ६-३, ७-६ ने सामना जिंकला.
निशिकाेरी,त्साेंगाची सलामी : पुरुषएकेरीत अाशियाईतील नंबर वन केई निशिकाेरी अाणि ज्याे विल्फ्रेंड त्साेंगाने विजयी सलामी दिली. या दाेन्ही खेळाडूंनी पहिल्या फेरीत शानदार विजय संपादन केला. जपानच्या निशिकाेरीने पहिल्या फेरीत अल्बर्टाे रामाेसवर ६-२, ६-४ ने मात केली. त्साेंगाने सामन्यात मालेकचा ४-६, ७-५, ६-३ ने पराभव केला.
बातम्या आणखी आहेत...