आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांबा डान्ससह पॅरालिम्पिक स्पर्धेला रंगारंग सुरुवात!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दी जानेरिओ- रिओ ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर ब्राझिलच्या रिओ दी जानेरिअोत गुरुवारी २०१६ च्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद््घाटन सोहळा पार पाडला. सांबा गायकांनी प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या मॅराकाना स्टेडियममध्ये आपल्या प्रस्तुतीने सोहळा रंगवला. ब्राझीलचा पॅरालिम्पिक जलतरणपटू डॅनियल डायसने ब्राझीलच्या संघाचे नेतृत्व केले. भारताने या वेळी विक्रमी १९ खेळाडू या स्पर्धेत खेळवले आहेत.

पॅरालिम्पिक ज्योत प्रज्वलित : उद््घाटनसोहळ्यात बुधवारी ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली. पॅरालिम्पिकच्या उद्््घाटनस्थळी इंग्लंडचा स्टोक मांडेविलेने प्रवास पूर्ण केला. त्याने सहाव्या मशालीने ज्योत पेटवली. स्पर्धेत १५९ देशांचे ४३४२ खेळाडू सहभागी होत आहेत. यात आंतरराष्ट्रीय रिफ्युजी टीमचे सदस्यही सामील आहेत. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष फिलिप क्रेवन यांनी उद्््घाटन सोहळ्याच्या वेळी म्हटले की, हे खेळ जगभरात अपंग लोकांबद्दलची भावना बदलण्यास मदत करतील समाजात बदल घडवतील,’ असेही क्रेवन यांनी म्हटले.

अमित सरोहाचे निराशाजनक प्रदर्शन : एफ-५१श्रेणीतील पॅराअॅथलिट अमित सरोहा केवळ ९.०१ मीटर लांब थाळीफेक करू शकला. सात स्पर्धकांत तो अखेरच्या स्थानी राहिला. लॅटव्हियाच्या अॅगर्स एपिनिसने २०.८३ मीटर लांब थाळी फेकून सुवर्णपदक जिंकले. पोलंडचा रॉबर्ट जॅकिमोविचने (१९.१० मीटर) रौप्यपदक पटकावले.
बातम्या आणखी आहेत...