आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rio Paralympics: M Thangavelu Clinches Gold, Varun S Bhati Bronze In High Jump

पॅरालिम्पिक: मरियप्पन, वरुण भाटीची ‘पदक'उडी; 32 वर्षांनंतर एकाच खेळात दोन पदके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - रिओ पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांसह भारताने दणदणीत सुरुवात केली आहे. उंच उडीत (टी-४२) भारताचा पॅरा अॅथलिट मरियप्पन थांगावेलूने शानदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले. याच खेळ प्रकारात भारताच्या वरुण भाटीने कांस्यपदक मिळवत भारताला दुहेरी यश मिळवूून दिले.

पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी थांगावेलूने १.८९ मीटरची उडी मारताना सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर भाटीने १.८६ मीटरच्या उडीसह कांस्यपदक मिळवले. भारताच्या संदीपचे भालाफेकीत पदक थोडक्याने हुकले. त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

तामिळनाडूचा २० वर्षीय थांगावेलू पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी असे यश मुरलीधर पेटकर (जलतरण, १९७२ हेजबर्ग) आणि देवेंद्र झाझरिया (भालाफेक, अथेन्स २००४) यांनी सुवर्णपदक जिंकले होते. यानुसार १२ वर्षांनी भारताने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने ३२ वर्षांनंतर पॅरालिम्पिकच्या एकाच खेळ प्रकारात दोन पदके जिंकली. याआधी १९८४ मध्ये भीमराव केसरकर (रौप्यपदक) आणि जोगिंदरसिंग बेदी (कांस्य) यांनी भालाफेकीत पदके जिंकली होती. बेदीने त्या पॅरालिम्पिकमध्ये आणखी दोन पदके जिंकली होती.

भारताची एकूण १० पदके
थांगावेलूआणि भाटी यांच्या या यशानंतर पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या एकूण पदकांची संख्या १० झाली आहे. यात सुवर्णपदके, रौप्यपदके आणि कांस्यपदके आहेत. रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा १९ सदस्यीय संघ पाठवला आहे.

अडचणींचा डोंगर सर करून मिळवले सुवर्ण
थांगावेलूची संघर्षकथा अशी

मरियप्पन थांगावेलूचा जन्म सेलमपासून ५० किमी जवळ असलेल्या पेरियावादमगट्टी गावात झाला. त्याची आई भाज्या विकून उदरनिर्वाह करते. त्याच्या आईने काही वर्षांपूर्वी मरियप्पनच्या उपचारासाठी लाखांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज ती आजही फेडू शकलेली नाही.
मरियप्पन वर्षांचा असताना शाळेत जाताना त्याचा अपघात झाला. या अपघातामुळे त्याच्या गुडघ्याखालील त्याचा पाय निकामी झाला. मरियप्पनला व्हॉलीबॉलमध्ये रुची होती. मात्र, त्याच्या शाळेच्या शिक्षकाने उंच उडीत त्याची गुणवत्ता हेरली. सर्वसाधारण खेळाडूंसोबत स्पर्धा करताना त्याने वयाच्या १४ व्या वर्षी उंचउडीत दुसरे स्थान मिळवून सर्वांना धक्का दिला.
त्याचे कोच सत्यनारायण यांनी त्याला वयाच्या १८ व्या वर्षी राष्ट्रीय पॅरा अॅथलिट चॅम्पियनशिपमध्ये पाहिले. बंगळुरूत कठोर सरावानंतर मरियप्पन २०१५ मध्ये नंबर वन बनला. वरिष्ठ गटात हे त्याचे पहिलेच वर्ष होते, हे विशेष. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मरियप्पनने ट्युनिशयात झालेल्या ग्रांप्रीमध्ये १.७८ मी. उडी मारून सुवर्ण जिंकत पॅरालिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.

पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. ‘रिओ पॅरालिम्पिकमध्ये मरियप्पन थांगावेलूने सुवर्ण आणि वरुण भाटीने कांस्यपदक जिंकल्यामुळे तमाम देशवासीय आनंदित झाले आहेत. विजयी खेळाडूंचे अभिनंदन,’ असे त्यांनी म्हटले.
पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंच्या अपंगत्वानुसार विविध गट असतात. मैदानी खेळात टी-४२ गट म्हणजे गुडघ्याच्या वर एक पाय निष्क्रिय झालेल्या खेळाडूंचा आहे. यात पाय कापला जाणे, पोलिओ किंवा अपघातामुळे स्नायू कार्य करणे, पाय पूर्णपणे विकसित होणे आदींचा समावेश असतो. या खेळप्रकारात भारताचे मरियप्पन थांगावेलू आणि वरुण भाटी खेळले.

टी-४२ म्हणजे गुडघ्याच्या खालचा एक पाय निष्क्रिय
मरियप्पन थांगावेलू सुवर्ण,१.८९ मी.
वरुण भाटी कांस्य,भारत,१.८६ मी.
रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण उडी घेताना भारताचा मरियप्पन थांगावेलू.
पॅरालिम्पिकमध्ये भारताचे पदक विजेते खेळाडू असे
-मुरलीकांत पेटकर १९७२ ५० मी. फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक
- जोगिंदरसिंग बेदी १९८४ गोळाफेकीत रौप्य, भाला आणि थाळीफेकीत कांस्यपदक
- भीमराव केसरकर १९८४ भालाफेकीत रौप्यपदक
- देवेंद्र झाझरिया २००४ भालाफेकीत सुवर्णपदक
- राजिंदर राहेलू २००४ भारोत्तोलनात कांस्यपदक
- गिरिशा नागराजेगौडा २०१२ उंच उडीत रौप्यपदक
- मरियप्पन थांगावेलू २०१६ उंच उडीत सुवर्णपदक
- वरुण भाटी २०१६ उंच उडीत कांस्यपदक.
बातम्या आणखी आहेत...