आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Rio Paralympics M Thangavelu Clinches Gold Varun S Bhati Bronze In High Jump

Real Hero: सुवर्ण जिंकणारा मरियप्पनचा बसने चिरडला होता पाय तर वरुण आहे पोलिओग्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअो- दिव्यांगांच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने शुक्रवारी एकाचवेळी सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले. ३२ वर्षांनंतर देशाला एकाच इव्हेंटमध्ये दोन पदके मिळाली आहेत. उंच उडी प्रकारात २० वर्षीय मरियप्पन थांगावेलूने सुवर्ण तर २१ वर्षीय वरुण भाटीने कांस्य जिंकले. पॅरालिम्पिकमध्ये १२ वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. देशासाठी प्रेरणा ठरलेल्या या पदक विजेत्यांची कथाही काही कमी प्रेरक नाही.

तामि‌ळनाडूच्या सालेम जिल्ह्यात जन्मलेला मरियप्पन थांगावेलू जन्मत: दिव्यांग नव्हता. वर्षांचा असताना शाळेत जात असताना बसने त्याचा उजवा पाय चिरडला होता. १७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कुटुंबाला लाख रुपये भरपाई मिळाली होती. आजही प्रशिक्षणाच्या वेळी मरियप्पनच्या पायतून रक्त स्रवू लागते.

बालपणी वडिलांनी कुटुंब सोडले होते. या कुटुंबाला कुणी किरायाने घरही देत नव्हते. घर चालवण्यासाठी आई सरोज विटा उचलण्याचे काम करायची. मात्र मान दुखू लागल्याने त्यांनी हे काम सोडले. ५०० रुपये उसने घेऊन भाजीपाला विक्री सुरू केली. उपचारासाठी तीन लाख रुपये कर्ज घेतले, त्याची आजवर परतफेड झाली नाही. मरियप्पनने १४ वर्षीय शालेय स्पर्धेत उंच उडीत (सामान्य गट) रौप्यपदक जिंकून सर्वांना धक्का दिला होता. तो आधी व्हॉलीबॉल खेळाडू होता. मात्र प्रशिक्षक सत्यनारायण यांच्या सल्ल्यानुसार तो नंतर उंच उडीकडे वळला.
तामिळनाडू सरकार देणार कोटी रुपये

वरुणला रोखले होते बास्केटबॉलपासून
ग्रेटरनोएडाचा वरुण भाटी बालपणापासूनच पोलिओग्रस्त आहे. तो आधी बास्टेकबॉल खेळत होता. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही खेळला होता. मात्र दिव्यांग असल्यामुळे त्याला बास्केटबॉलपासून रोखले होते. वारंवार काढून टाकल्यामुळे वरुण उंच उडीकडे वळला. बंगळुरूत प्रशिक्षक सत्यनारायण यांच्याकडे प्रशिक्षण घेतो.

पॅरालिम्पिकचे सुवर्णपदक जिंकल्यामुळे तामिळनाडू सरकारने मरियप्पनला दोन कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ७५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...