आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकसाठी रिओनगरी सज्ज ! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुढे जाणारे शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअो दि जानेरिओ - प्रत्येक ‘ऑलिम्पिक’ने यजमान शहरांना आर्थिक सुबत्तेची, भरभराटीची, पर्यटन व्यवसायापासून उद्योगांच्या वाढीची स्वप्ने दाखवली. त्या स्वप्नांमध्ये मश्गूल होऊन, कर्जबाजारी झालेले यजमान नंतर कफल्लक झाले. अपेक्षांची पूर्तता झाली नाही. अथेन्स ऑलिम्पिकचे आयोजन ‘न भूतो न भविष्यति’ असे करणाऱ्या ग्रीसची नंतर वाताहत झाली. चीनलाही ऑलिम्पिक फळले नाही. लंडनने स्वत:ला जेमतेम सावरले. आता रिओची वेळ आहे.
रिओचे नागरिक अनेक नागरी समस्या आणि इतर गोष्टींचाच जाब सतत सरकारला, प्रशासनाला विचारत आहेत. या ऑलिम्पिकमुळे पर्यटन व्यवसाय वाढेल, मात्र त्यातून नफा किती मिळेल याबाबत त्यांनाही शंका आहे. मात्र, ऑलिम्पिक तोंडावर आले असताना पाहुणे दारात उभे राहिल्यानंतर आपण नाइलाजाने का होईना, त्यांचे स्वागत करतो, तशी यजमानांची स्थिती झाली आहे. ‘ऑलिम्पिक’ तर होणारच आहे, मग आता विरोध कशाला? शक्य आहे ते करूया, अशी भावनी रिओवासीयांची आहे.
लॅटिन अमेरिकन देशांच्या ‘स्मार्ट’ शहरांची स्वत:ला ‘स्मार्ट’ करण्याची तऱ्हाही वेगवेगळी आहे. त्या सर्वांमध्ये रिओ पुढे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पुढे जाणारे हे शहर. या शहराचे महापौर एदुआर्दो पेस दूरदृष्टी असणारे. वयाची चाळिशी ओलांडलेले, परंतु अनुभवांनी समृद्ध परिपूर्ण असे ग्रीन पार्टी, डेमोक्रॅटिक आणि लेबर अशा तिन्ही पक्षांत जाऊन आता डेमोक्रॅटिक पक्षात स्थिरावलेले, परंतु अतिमहत्त्वाकांक्षी. २००७ च्या लॅटिन अमेरिकन खेळांच्या यशस्वी आयोजनानंतर त्यांनी ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचे आयोजन रिओत आणले. ऑलिम्पिक यजमानपदही मिळवले. खेळाच्या अर्थकारणामुळे शहराचा विकास साधण्याचा त्यांचा ध्यास. जागतिक, आर्थिक मंदीचा फटका सहन करत असतानाच ‘झिका’ या डासाच्या डंखाने त्यांची आर्थिक गणितेच चुकायला लागली. कराचा बोजा वाढणार या भीतीने जनतेचा वाढता क्षोभ, असहकार आणि असंतुष्टता याची छाया पृथ्वीतलावरच्या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवावर पडली आहे. मात्र अंतिम क्षणी, जगभरातील पाहुण्यांच्या आगमनाबरोबर त्यांच्यातला विरोधही मावळायला लागला आहे. ऑलिम्पिक साजरे करण्यासाठी दम लगाके हैशा... म्हणत त्यांचेही मदतीचे हात पुढे येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...