आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिओतील पहिले पदक : साक्षी मलिकने बांधली कांस्यपदकाची राखी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे - रिअाे अाॅलिम्पिकमधील पहिले अाॅलिम्पिक पदक भारताची ५८ किलाे वजनी गटातील महिला मल्ल साक्षी मलीक हिने कांस्यपदक पटकावत भारताला रिअाे अाॅलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले. साक्षीने किर्गिस्तानच्या ओसूलू तोयेबेकाेवाला अत्यंत अटीतटीच्या लढतीत 7-5 असे पराभूत करुन भारताला पहिले पदक मिळवून देत पदकांचे खाते उघडले.

पहिल्या हाफमध्ये साक्षी 0-5 अशी पिछाडीवर पडली होती. मात्र उत्तरार्धात प्रथम 4 गुण त्यानंतर 1 गुण मिळवत बरोबरी साधली. सामन्या संपण्यास 10 सेकंद शिल्लक असतांना 3 गुणांची कमाई करत साक्षीने कांस्यपदकावर नाव कोरले.

रेपीचेजमुळे मिळालेल्या पहिल्या संधीचे सोने करीत साक्षी मलिकने तिची प्रतिस्पर्धी मंगोलियाच्या ओरखोन पूरेवडोजला चारी मुंड्या चीत करीत बाजी मारली. या लढतीच्या प्रारंभीच्या २० सेकंदांतच साक्षीने ओरखोनला उपडे पाडत 2 गुणांची कमाई केली. तर त्यानंतर पावणेदोन मिनिटांच्या कालावधीत ओरखोनने 2 गुण कमावत बरोबरी साधली. उत्तरार्धाच्या प्रारंभीदेखील साक्षीने आक्रमक खेळाचा अवलंब करीत 2 गुण मिळवले. त्यानंतर पाच मिनिटांनी पुन्हा जोरदार चढाई करीत 6 गुण पटकावत तिची गुणसंख्या 10 पर्यंत नेऊन ठेवली. या विजयी आघाडीवरच सामना संपण्याची चिन्हे असताना साक्षीने पुन्हा 2 गुण पटकावत हा सामना 12 -3 असा जिंकला. पहिल्या लढतीत साक्षी मलिकने स्वीडनच्या जोहाना मालिन मॅटसनशी जोरदार चढाई करीत सामना 2-9 असा जिंकला. त्यानंतर उपउपांत्यपूर्व लढतीत साक्षी मलिकची लढत माल्दोवाची मारियाना चारदिवारा एसानू हिच्यासमवेत झाला. या लढतीतही एका डावात गुण मिळवले असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले. उपांत्यपूर्व लढतीत रशियाची वेलेरिया कोबलोवाशी झाली. या लढतीत वेलेरियाने साक्षीवर मात 5 - 4 अशी मात केली. त्यामुळे साक्षीला रेपीचेजमुळे संधी मिळाली.

काय असते रेपीचेज
कोणताही मल्ल उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होतो, तो थेट बाहेर फेकला जाण्याएेवजी त्याला एक संधी मिळते. मात्र, त्यासाठी त्या लढतीत जो मल्ल विजयी होतो, तो पुढे अंतिम लढतीत पोहोचावा लागतो. त्या केसमध्ये उपांत्यपूर्वमध्ये हारलेल्या मल्लाला दाेन लढती खेळण्याची संधी मिळते.

कुस्तीत पाचवे पदक
भारतीयसंघाला अाॅलिम्पिक कुस्तीत पाचवे पदक जिंकता अाले. १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीत पहिले अाॅलिम्पिक पदक जिंकून दिले. त्यांनी हेलसिंकी अाॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले हाेते. त्यानंतर भारताला पदकासाठी २००८ पर्यंत प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. २००८ बीजिंग अाॅलिम्पिकमध्ये सुशीलकुमारने कांस्यपदक पटकावले. भारताचे हे अाॅलिम्पिकमधील दुसरे कांस्यपदक ठरले. त्यानंतर २०१२ मध्ये सुशीलने भारतासाठी राैप्यपदकाची कमाई केली. याच वेळी याेगेश्वर दत्त हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला हाेता. त्यानंतर अाता रिओत साक्षी मलिक कांस्यपदकाची मानकरी ठरली.

महिला गटात पहिले पदक
साक्षीमलिकने २०१६ रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेत जिंकलेले पदक हे भारतीय संघासाठी एेतिहासिक ठरले. तिचे हे महिला गटातील पहिले पदक अाहे. भारतीय संघाला अाॅलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी साक्षी ही पहिली महिला कुस्तीपटू ठरली अाहे. तिने रेपचेजमध्ये मिळालेल्या संधीचे चीज करताना पदकावर नाव काेरले. भारताच्या बबिताकुमारी, गीता फाेगट, विनेशला अद्याप पदकापर्यंत मजल मारता अाली नाही.

जन्म : जानेवारी १९९३,
राेहतक (हरियाणा)
उंची: 5 फूट 4 इंच
वजन: ५८ किलाे
प्रशिक्षक: ईश्वरदहिया

- राैप्य २०१४ राष्ट्रकूल स्पर्धा ग्लासगो
- कांस्य २०१५ अाशियाई स्पर्धा दोहा
- कांस्य २०१६ रिओ ऑलिम्पिक ब्राझील
सहभाग : २०१४वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप
२०१५ सीनियर एशियन कुस्ती चॅम्पियनशिप

पुढील स्लाईड्सवर पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...