आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच जम्बाे जेट पार्कच्या जागेत डायनिंग हाॅल, रिअाे अाॅलिम्पिक व्हिलेजचे अनावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिअाे - अाॅलिम्पिक डेच्या (२३ जून) निमित्ताने रिअाे अाॅलिम्पिक व्हिलेजचे अनावरण करण्यात अाले. अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी हाेणारे जगभरातील तब्बल १७,००० खेळाडू अाणि टीम अधिकारी ५ अाॅगस्टपासून या क्रीडाग्राममध्ये राहणार अाहेत. त्यानंतर पॅराॅलिम्पिक स्पर्धेतील सहभागी ६००० खेळाडूंची व्यवस्था करण्यात अाली. व्हिलेजचा मुख्य डायनिंग हाॅल २१,७०० स्क्वेअर मीटरचा तयार करण्यात अाला. या हाॅलमध्ये पाच माेठे जेट पार्क तयार हाेऊ शकतात. ब्राझीलचा माजी स्टार बास्केटबाॅलपटू जेनिथ अार्केनलची क्रीडाग्रामच्या महापाैर म्हणून निवड केली अाहे. यशिवाय अाणि सहा अाॅलिम्पिक, मारिअाे सिलेंटची क्रीडाग्रामच्या डायरेक्टरपदी वर्णी लागली अाहे. या दाेघांवरही अाता क्रीडाग्राममधील सर्व साेयी-सुविधांची जबाबदारी असेल.

फ्री स्मार्टफोन
रिअाे अाॅलिम्पिकमधील सहभागी प्रत्येक खेळाडूला माेफत स्मार्टफाेन देण्यात येईल. यासह जिम व ब्यूटी सलूनची सुविधा मिळेल. याठिकाणी कियाेस्क उघडणार अाहेत. यात २४ तास फळांचे ज्यूस, स्नॅक मिळतील. इतर मनाेरंजनात्मक सेवाही याठिकाणी मिळणार अाहेत.

सर्वांचे एक्स-रे स्कॅन
क्रीडाग्रामच्या सुरक्षेसाठी कडक बंदाेबस्त तैनात करण्यात अाला आहे. प्रत्येक व्यक्तीला एक्स-रे स्कॅन करून जावे लागेल. ५०० पाेलिस तपासणी करतील. १८ जुलैपासून अधिकारी व २४ जुलैपासून खेळाडू येणार अाहेत.

धार्मिक मदत मिळेल
अाॅलिम्पिकदरम्यान खेळाडूंना धार्मिक मदत उपलब्ध करण्यात येईल. यासाठी याठिकाणी हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बाैद्ध अाणि यहुदीचे धार्मिक सेंटर तयार करण्यात अाले. यात ध्यानधारणेसह धार्मिक पुस्तकांची सुविधा असेल.
बातम्या आणखी आहेत...