आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राॅजर फेडरर पराभूत; राअाेनिक फायनलमध्ये, पेस हिंगीसचाही पराभव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - कॅनडाच्या मिलाेस राअाेनिकने शुक्रवारी सत्रातील तिसऱ्या ग्रॅण्डस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात स्विसकिंग राॅजर फेडररचा पराभव केला. सहाव्या मानांकित राअाेनिकने ३ तास २५ मिनिटांच्या मॅरेथाॅन लढतीत ६-३, ६-७, ४-६, ७-५, ६-३ अशा फरकाने सनसनाटी विजय संपादन केला. विम्बल्डनची फायनल गाठणारा राअाेनिक हा पहिला कॅनडियन टेनिसपटू ठरला. या पराभवामुळे फेडररचे १८ व्या ग्रॅण्डस्लॅम किताब जिंकण्याचे स्वप्न भंगले.
विल्यम्स भगिनी फायनलमध्ये
सेरेना अाणि व्हीनस या अमेरिकेच्या स्टार टेनिसपटू भगिनींनी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात शानदार विजय साकारला. या बिगरमानांकित जाेडीने सामन्यात अाठव्या मानांकित जाॅर्जस-प्लिस्काेवाला ७-६, ६-४ ने पराभूत केले. अाता सेरेनाला यंदाच्या स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी अाहे. तिने एकेरीचीही फायनल गाठली अाहे.

पेस-मार्टिना बाहेर
भारताच्या स्टार टेनिसपटूंचे अाव्हान संपुष्टात अाले. मिश्र दुहेरीतील गत विजेत्या लिएंडर पेसला मार्टिना हिंगीससाेबत पराभव झाला. इंग्लंडच्या हिदर वाॅटसन वफिनलंडच्या हेन्री काेटीनेईने पेस-मार्टिनावर मात केली. या जाेडीने ३-६, ६-२, ६-२ ने विजय मिळवला.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...