आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Roger Federer Beats Novak Djokovic In The ATP World Tour Finals

रॉजर फेडररने रोखला योकोविकचा विजयरथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- एटीपी फायनल्समधील गेल्या १५ सामन्यांमध्ये विजयी राहिलेल्या नोवाक योकोविकचा विजयरथ अखेर राॅजर फेडररने राेखला. फेडररने मोसमातील अंतिम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित सर्बियन टेनिसपटूला ७-५, ६-२ ने मात दिली.

वर्षअखेरीस एटीपी जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल सिंहासन कायम राखण्यात योकोविकने यश मिळवले आहे. २०११ पासून त्याने एकाही एटीपी फायनल्समध्ये पराभव स्वीकारला नाही. टेनिस विश्वातील अग्रणी आठ खेळाडंूचा समावेश असलेल्या तीन स्पर्धांच्या जेतेपदावर त्याने ताबा मिळवला आहे.

मात्र, इनडोअर हार्ड कोर्ट असलेल्या ओटू एरिनात फेडररशी मुकाबला करणे तेवढे सोपे नव्हते. कारण राॅजरला या कोर्टचा राजा समजले जाते. सहा वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या फेडररनेे योकोविकला सरळ दोन सेटमध्ये सहज नमवले.