आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन : मॅरेथॉन लढतीत स्विस किंग फेडररची सिलिचवर मात, सेमीफायनलमध्ये धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मॅरेथॉन लढतीत क्वार्टर फायनलमध्ये क्रोएशियाच्या मारिन सिलिचला पराभूत करून सेमीफायनल प्रवेश केला. इतर एका क्वार्टर फायनल सामन्यात कॅनडाच्या मिलोस राओनिकने युवा खेळाडू सॅम क्वेरीला पराभूत करून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले.
दोन सेट गमावल्यानंतर पुनरागमन
तिसरा मानांकित स्विस किंग रॉजर फेडररची सामन्यात चांगली सुरुवात झाली नाही. फेडररला १३ वा मानांकित सिलिचविरुद्ध विजय मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. फेडररने तब्बल ३ तास १७ मिनिटांच्या संघर्षानंतर सामन्यात विजय मिळवला. पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात फेडररने सुरुवातीचे दोन सेट गमावले. तिसऱ्या सेटमध्येही फेडरर ३-२ असा मागे पडला होता. यानंतर फेडररने जबरदस्त पुनरागमन करताना आपल्या अनुभवाची प्रचिती िदली. यानंतर फेडररने पुढचे तिन्ही सेट जिंकून सामना फिरवला. फेडररने सिलिचला ७-६ (७-४), ६-४, ३-६, ६-७ (११-९), ३-६ ने हरवले.

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये राओनिकने सहज विजय मिळवला. विम्बल्डनमध्ये नंबर वन नोवाक योकोविकला पराभूत करून धक्कादायक विजय मिळवणाऱ्या सॅम क्वेरीला राओनिकने बाहेर केले. राओनिकने चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात क्वेरीला ६-४, ७-५, ५-६, ६-४ ने हरवले. क्वेरीने तिसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र, त्याला पुढे ती लय कायम ठेवता आली नाही. योकोविकविरुद्ध सॅम क्वेरी जसा खेळ केला, तसा तो यावेळी करू शकला नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, विम्बल्डनमध्ये टॉयलेट ब्रेकसाठी कोर्टवर भांडण

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...