आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यावधीच्या लग्जरियस मेंशनमध्ये राहतो फेडरर, पाहा Inside Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लास वॉल हेच रॉजर फेडररच्या घराचे आकर्षण आहे. - Divya Marathi
ग्लास वॉल हेच रॉजर फेडररच्या घराचे आकर्षण आहे.
स्पोर्ट्स डेस्क- वर्ल्ड नंबर तीन टेनिस स्टार रॉजर फेडररने रविवारी विक्रमी आठव्यांदा विंबल्डन जिंकले. तसेच फेडररच्या नावावर आता एकून 19 ग्रॅंडस्लॅम झाली आहेत. सर्वाधिक सिंगल टायटल जिंकण्याचा विक्रम यापूर्वीच त्याने केला. आता त्यात त्याने एकाची भर घातली आहे. फेडररने 19 वेळा सिंगल्स टायटल जिंकताना 8 वेळा विंबल्डन, पाच वेळा ऑस्ट्रेलियन ओपन तर तेवढ्याच वेळा यूएस ओपन जिंकली आहेत. याशिवाय त्याने फ्रेंच ओपनमध्येही एकदा टायटल मिळवले आहे. त्याच्यामागे आता राफेल नदाल (15) पीट सम्प्रास (14) तर रॉय इमर्सन आणि नोवोक जोकोव्हिक (प्रत्येकी 12) आहेत. त्यामुळे फेडररचा हा विक्रम पुढील काही दशके त्याच्याच नावावर राहण्याची शक्यता आहे. टेनिसमधील सुपरस्टार फेडरर हा सुमारे 2000 कोटी रूपयांचा (300 मिलियन डॉलर) संपत्तीचा मालक आहे. साहजिकच फेडरचे घर टेनिस स्टार्समध्ये सर्वात जास्त लग्झरी आहे. स्वित्झरलँडमधील वॉलेरुमध्ये त्याचे हा सुपर लग्झिरियस मेंशन आहे. असे दिसते 57 कोटींचे घर...
 
- डिसेंबर, 2014 मध्ये फेडरर आपल्या नव्या घरात शिफ्ट झाला आहे. 
- 3 मजली हे घर जिनेव्हातील लेक किना-या बनविले आहे.
- या घराचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये हे आहे की, हे घर ग्लास वॉलने बनलेले आहे म्हणजे फ्लोरपासून सीलिंगपर्यंत. 
- उंच उंच व लांबच लांब अनेक बाल्कनीत सुंदर असा वॉटर व्यू दिसतो.
- फेडरर 2008 पासून वॉलेरुमध्ये राहतो. मात्र त्याचा जन्म बेसलमध्ये झाला आहे. 
- हे घर ज्यूरिचपासून केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. 
- याशिवाय त्याचे आणखी एक घर स्वित्झरलँडमधील वॉलबेलामध्ये आहे जेथे टेनिस कोर्ट सुद्धा उभारले आहे.
 
असा जगतो लाईफ-
 
- फेडररचे एक लग्झरी घर दुबईत सुद्धा आहे. जेथे तो बहुतांश वेळा प्रॅक्टिस करतो.
- फेडररच्या म्हणण्यानुसार, ‘दुबईत जास्त तापमान असते. त्यामुळे येथे खेळून तो दुस-या देशातील वातावरणात तेवढ्याच दमाने व ताकदीने खेळ करता यावा म्हणून दुबईत सराव करतो.
- त्याची फेवरेट कार मर्सडीज बेंज ( SLS AMG Roadster) आहे. 
- फेडरर त्या निवडक स्पोर्ट्स स्टार्सपैकी एक आहे ज्याच्याजवळ प्रायवेट जेट आहे. 
- तो वॉटर स्पोर्ट्सचा शौकीन आहे. तो सुट्टीत नेहमीच स्विमिंग करताना दिसतो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आतून कसे दिसते रॉजर फेडररचे संपूर्ण काचेचे घर....