आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस मास्टर्स : फेडररचा अनपेक्षित पराभव; याेकाेविक अंतिम अाठमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक, माजी नंबर वन राफेल नदालने शानदार विजयासह शुक्रवारी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे अनपेक्षितपणे पराभवामुळे स्विसकिंग राॅजर फेडररचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.

गंभीर दुखापतीमुळे सध्या पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या नदालने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत राेमहर्षक विजय मिळवला. त्याने दक्षिण अाफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला ४-६, ७-६, ६-२ अशा फरकाने पराभूत केले. यासाठी त्याला तीन सेटपर्यंत झंुज द्यावी लागली. पहिल्या सेटमधील अपयशातून सावरलेल्या नदालने दुसऱ्या अाणि तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला. अाता त्याचा सामना वावरिंकाशी हाेईल.

वावरिंकाचा एकतर्फी विजय
सर्बियाच्या वावरिंकाने एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एकतर्फी विजय मिळवला. त्याने व्हिक्टर ट्राेसिकीला धूळ चारली. वावरिंकाने ६-४, ७-५ अशा फरकाने सामना जिंकला. अाता त्याच्यासमाेर स्पेनच्या राफेल नदालचे तगडे अाव्हान असेल.

याेकाेविकचा १९ वा विजय
सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकने सलग १९ व्या विजयाची नाेंद केली. त्याने एकेरीच्या तिसऱ्या फेरीत १४ व्या मानांकित जाॅइल्स सिमाेनवर सरळ दाेन सेटमध्ये ६-३, ७-५ ने विजय मिळवला.

वाेज्नियाकीला दुखापत
डेन्मार्कची कॅराेलिना वाेज्नियाकीला ब्रेड कापताना धारदार चाकू लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला डब्ल्यूटीए एलिट ट्राॅफी टेनिस स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, अशी माहिती अायाेजकांनी दिली.