आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohan Bopanna Florin Mergea Win Stuttgart Open Title

मर्सिडीझ अाेपन टेनिस स्पर्धेत राेहन बाेपन्नाला दुहेरीचा किताब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुटगार्ट- भारताचा अव्वल टेनिसपटू राेहन बाेपन्नाने रविवारी मर्सिडीझ अाेपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचा किताब पटकावला. त्याने अापला सहकारी फ्लाेरिन मेर्गासाेबत हे साेनेरी यश संपादन केले. या चाैथ्या मानांकित जाेडीने अंतिम सामन्यात अलेक्झांडर पेया अाणि ब्रुनाे साेरेसचा पराभव केला. बाेपन्ना-फ्लाेरिनने ५-७, ६-२, १०-७ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. यासह या जाेडीने दुसऱ्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद अापल्या नावे केले. चाैथ्या मानांकित जाेडीने एक तास ११ मिनिटांत फायनल जिंकले.

नदालला एकेरीचे जेतेपद : स्पेनच्या राफेल नदालने अाठ वर्षानंतर मर्सिडीज अाेपनमध्ये पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने अंतिम सामन्यात अाठव्या मानांकित व्हिक्टर ट्राेयकीवर मात केली. त्याने ७-६, ६-३ ने सामना जिंकला. यासह त्याने तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले.