आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे रोनाल्डोचे अलिशान हॉटेल, डोनाल्ड ट्रम्पदेखील आहेत भागिदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिस्टियानाे राेनाल्डाेने माेनाकाे येथे खरेदी केलेले हेचते अलिशान हॉटेल. (इंसेटमध्ये रोनाल्डो.) - Divya Marathi
क्रिस्टियानाे राेनाल्डाेने माेनाकाे येथे खरेदी केलेले हेचते अलिशान हॉटेल. (इंसेटमध्ये रोनाल्डो.)
मोनाको- पाेेर्तुगालच्या क्रिस्टियानाे राेनाल्डाेने फुटबाॅलच्या विश्वात अनेक गाेल केले अाणि अब्जावधी रुपयांची कमाई केली. मात्र, अाता त्याने अापले फुटबाॅलमधील भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हाॅटेलच्या व्यवसायात पाऊल ठेवले. यासाठीच त्याने माेनाकाे येथे एका चांगल्या परिसरामध्ये हाॅटेलची खरेदी केली. या हाॅटेलची किंमत साधारणपणे 1036 काेटींच्या जवळपास अाहे. राेनाल्डाेच्या या हाॅटेलमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या उमदेवारीसाठी शर्यतीमध्ये असलेले डाेनाल्ड ट्रम्प अाणि इंग्लंड रिअल इस्टेट कंपनी भागीदार अाहेत.
राेनाल्डाेने लवकरच या हाॅटेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हे हाॅटेल त्याच्या स्वप्नातील याेजनेप्रमाणे तयार करण्यात अाले अाहे. यासाठी त्याने नुकताच पेस्ताना हाॅटेल ग्रुपसाेबत करार केला अाहे. ‘मी अद्याप युवा अाहे. त्यामुळे मी अजूनही बरीच वर्षे खेळत अाहे. मात्र, हे कायम राहणार नाही. त्यासाठी मी अागामी भविष्य अधिक सुरक्षित राहावे, यासाठी हाॅटेलच्या व्यवसायात पदार्पण करत अाहे.

त्यासाठीच मी ‘सीअार 7 हाॅटेल्स’चा नवीन प्राेजेक्ट सुरू करत अाहे,’ अशी माहिती राेनाल्डाेने दिली. त्यासाठी मला अनेकांचे सहकार्य मिळाले. यातूनच अाता मी लवकरच लिस्बन, फुंचाल, माद्रिद अाणि न्यूयाॅर्क येथे हाॅटेल सुरू करणार अाहे. त्याची अाता लवकरच घाेषणा करण्यात येणार अाहे, असेही राेनाल्डाेने सांगितले.
- 544- काेटींची राेनाल्डाेची एकूण संपत्ती
- 10 वा- सर्वात महागडा खेळाडू (फाेर्ब्स)
- 518- गाेल राेनाल्डाेने अातापर्यंत केले
पुढील स्लाइड्सवर पाहा, हॉटेलचे इंटेरिअर, असे दिसते हॉटेल...
-कसे आहे बेडरूम...
-असा आहे हॉटेलचा नकाशा...