आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुमन फायटर रॉन्डाची नंबर वन बॉक्सर मेवेदरला धमकी, म्हणे, 'दम असेल तर फाइट कर'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लॉयड मेवेदर आणि रॉन्डा रॉउसी. - Divya Marathi
फ्लॉयड मेवेदर आणि रॉन्डा रॉउसी.
मियामी: मिक्स्ड मार्शल आर्ट्स चैम्पियन रॉन्डा रॉउसी हिने आज गुरुवार (दि.16) ला जगातील बेस्ट प्रोफेशनल बॉक्सर फ्लॉयड मेवेदरला खुली धमकी दिली आहे. मेवेदरची वर्षातील 'बेस्ट फायटर अवॉर्ड'साठी निवड करण्यात आल्यानंतर तिने ही धमकी दिली आहे. या अवॉर्डच्या शर्यतीत मेवेदरशिवाय रॉउसीदेखील होती. हा अवॉर्ड तिला मिळाला नाही म्हणून तिचा प्रचंड जळफळाट झाला आहे. रॉउसी म्हणाली, "मला बघायला आवडेल, की मेवेदारला वुमन बॉक्सर कडून हरायला कसे वाटेल?" त्याला माहित नाही मी कोन आहे? तर मलाही माहीत नाही तो कोण आहे? पण जर त्याच्यात दम असेल तर त्याने माझ्यासेबत फाइट करूनच दाखवावी.

का दिली रॉउसीने अशी धमकी ?
मेवेदरला काही दिवसांपूर्वी रॉन्डा रॉउसीलच्या संदर्भात प्रश्न विचारलागेला होता. प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाल, " मी तिला ओळखत नाही, त्यामुळे तिच्या बद्दल काहीच बोलूशकत नाही. यामुळे रॉउसी चिडली होती, ज्याचा राग तिने मेवेदरवर धमकी देऊन काढला.
रॉन्डा रॉउसीवर एक दृष्टीक्षेप
रॉन्डा मिक्स्ड मार्शल आर्ट्सची बेस्ट फायटर आहे.
रॉन्डा पुरुष बॉक्सर्स सोबत करते सराव.
प्रोफेशनल फाइट्समध्ये आजपर्यंत कधीच हरली नाही. आतापर्यंत तिने 14 फाइट्स जिंकल्या आहेत.
हॉलिवूड फिल्म - The Expendables 3 (2014), Furious 7 (2015) आणि Entourage (2015) मध्ये कम केले आहे.
ऑलंपिक -2008 मध्ये तिने ज्युदोचे ब्रॉन्झ मेडलही जिंकले आहे.

मेवेदर कडून हिसकावला होता 'फाइट ऑफ द सेंचुरी' मध्ये मिळवलेला पुरस्कार.
मेवेदरने 2 मेला 'फाइट ऑफ द सेन्चुरी' मध्ये पकायाऊला हरवून वर्ल्ड वेल्टरवेट चैम्पियनचा पुरस्कार मिळवला होता. मात्र, नंतर 'वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायझेशन'ने (WBO) नियम तोडले म्हणून आणि मंजूरी शुल्क (sanctioning fee) न चुकावल्यामुळे त्याचा हा संमान काढून घेण्यात आला. नंतर तो अमेरिकेच्या टिमोथी ब्रेडलीला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेवेदर आजपर्यंत प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये कधीही हरलेला नाही. त्याने आजवर खेळलेल्या सर्वच्या सर्व 48 फाइट्स जिंकल्या आहेत. तो जगातील सर्वातधिक श्रीमंत अॅथलीट आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रॉन्डा रॉउसीचे काही खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...