आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोंडा राउसीची दबंगगिरी कायम; बेथे कोरिया ३४ सेकंदांत चीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- रोंडा राउसीने अल्टिमेट फाइट चॅम्पियनशिपमध्ये (यूएफसी) आपला दबदबा कायम ठेवला आहे. अमेरिकेच्या या खेळाडूने शनिवारी रात्री तिला आव्हान देणाऱ्या ब्राझीलच्या बेथे कोरियाला अवघ्या ३४ सेकंदांत चीत केले. २८ वर्षीय राउजीने सुरुवातीला अपरकट मारले आणि नंतर एक जोरदार ठोसा नाकावर मारला. आतापर्यंत अजेय ठरलेल्या कोरियाला राउजीच्या एका पंचने जाणीव झाली की तिला आव्हान देणे हे सोपे काम मुळीच नाही. तिने पराभव स्वीकारला. तिच्या कारकीर्दीतील हा पहिला पराभव (९-१) ठरला.
बातम्या आणखी आहेत...