आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ronda Rousey’S Next Fight Is Going To Be Big, Maybe Bigger Than Floyd Mayweather Jr.’S Last One

ही आहे जगातील सर्वात महागडी रिंग गर्ल; सौंदर्याच्‍या बळावर कमावते पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरेनी कॅलेस्टे - Divya Marathi
एरेनी कॅलेस्टे
यूएफसी (अल्टीमेट फाइटिंग चॅम्पियनशिप) मध्ये ऑस्ट्रिलियाच्या मेलबर्न येथील इतिहाद मैदानावर 15 नाव्‍हेंबर रोजी दोन सुंदर तरुणींमध्‍ये पुढील फाइट होणार आहे. त्‍यामुळे आताच या खेळाचे सर्व तिकीट विकले गेलेत. दरम्‍यान, या दोघींमध्‍ये आणखी एक सौंदर्याची राणी असणार आहे, जी की आपल्‍या ग्‍लॅमरने सर्वांचे मनोरंजन करेल. ती तरुणी म्‍हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगातील सर्वाधिक मानधन घेणारी 'रिंग गर्ल' एरेनी कॅलेस्टे आहे.
रिंग गर्ल म्‍हणजे काय?
फाइटच्‍या दरम्‍यान ब्रेक झाल्‍यावर जी तरुणी बॅनर घेऊन येते तिला रिंग गर्ल म्‍हणतात. या बॅनरवर राउंडचा नंबर लिहिलेला असतो. एरेनी ही जगातातील सर्वाधिक महागडी रिंग गर्ल आहे. आपल्‍या या कामासाठी ती वार्षिक 50 हजार डॉलर (33.1 लाख रुपये) पगार घेते. या शिवाय तिला मॉडलिंग आणि फाइटमध्‍ये वेगळे पैसे मिळतात. प्ले ब्वॉय या मासिकाची ती टॉनची मॉडलसुद्धा आहे. या खेळाचे चाहते फाइटरपेक्षाही अधिक तिचेच नाव घेऊन ओरडतात. पण, 15 नाव्‍हेंबरच्‍या या खेळात असे होईल की नाही, असे सांगता येत नाही. कारण यात फाइट करणाऱ्या दोन्‍ही मुली अत्‍यंत सुंदर आहेत.
कोण आहे एरेनी कॅलेस्टे?
एरेनी रिंग गर्ल, मॉडल आणि टीव्‍ही होस्ट आहे. लास वेगासमध्‍ये 12 नाव्‍हेंबर 1985 रोजी तिचा जन्‍म झाला. तिचे खरे नाव पेनेलोप लोपेज आहे. पण, खूपच कमी लोक तिला त्‍याच्‍या खऱ्या नावाने ओळखतात. तिने मॉडलिंगमध्‍ये येण्‍यापूर्वी फिटनेस मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशियनचा कोर्स केला. यूएफसीनेही तिच्‍या सौंदर्यावर भाळून तिला मोठे मानधन देत 2006 मध्‍ये हार्ड रॉक होस्टल आणि कॅसिनो यांच्‍यात झालेल्‍या फाइटसाठी साइन केले. त्‍यानंतर ती यूएफसीमध्‍ये रिंग गर्ल म्‍हणून सक्रिय झाली.

ब्वॉयफ्रेंडला झोडपले; जेलमध्‍ये गेली
एरेनीने विन लास वेगास हॉटलमध्‍ये 2012 या वर्षी ब्वॉयफ्रेंड प्रवीण चंद्राला मारहाण केली होती. त्‍यामुळे तिला जेलमध्‍येही जावे लागले होते. या दोघांमध्‍ये नेहमीच वाद होत असत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा एरेनीजे निवडक फोटोज...