आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओ ओलिम्पिक : ११२ वर्षांनी गोल्फचा समावेश, तरीही खेळाडूंची माघार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - तब्बल ११२ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये गोल्फचा समावेश झाला आहे. यामुळे जगभरातील दिग्गज गोल्फर आपल्या देशासाठी पदक जिंकण्याचे लक्ष ठरवून खेळतील, असे वाटत होते. मात्र, याउलट घडत आहे. आतापर्यंत बऱ्याच दिग्गज गोल्फपटूंनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. नॉर्दर्न आयर्लंडचा स्टार रॉरी मॅक्लरॉयनेही नुकतीच ऑलिम्पिकमधून माघार घेतली. झिका व्हायरसमुळे आपण माघार घेत असल्याचे तो म्हणाला. मॅक्लरॉय म्हणाला, "माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. यामुळे मी आरोग्याबाबत कसलीही जोखीम घेऊ इच्छित नाही. '

सात आठवड्यांत होणार चार मोठ्या गोल्फ स्पर्धा
रिओ ऑलिम्पिकच्या आधी आणि नंतरसुद्धा गोल्फ स्पर्धेचे वेळापत्रक व्यग्र आहे. यामुळेसुद्धा अनेक खेळाडू माघार घेत आहेत. सात आठवड्यांत चार मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांत बक्षीस रक्कम खूप अधिक असते. ऑलिम्पिकच्या दबावासह या स्पर्धांत खेळण्यास बरेच खेळाडू तयार नाहीत. शिवाय ऑलिम्पिकची कामगिरी खेळाडूंना क्रमवारीत फायद्याची ठरणार नाही. यामुळे अनेकांनी माघार घेतली.

अनिर्बाण लाहिरीवर असेल भारताची मदार
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची कटऑफ यादी ११ जुलैला जाहीर होणार आहे. भारताचा अनिर्बाण लाहिरी आणि एसएसपी चाैरासियाचा सहभाग निश्चित मानला जात आहे. लाहिरी यूएस ओपनच्या माध्यमान सलग आठव्या मेजर गोल्फ स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याने २ युरो टूरसह १८ किताब जिंकले आहेत.

मॅक्लरॉयच्या आधी यांनी घेतली माघार
- विजय सिंग (फिजी) : ३४ पीजीए टूरसह ५९ किताब.
- अॅडम स्कॉट (ऑस्ट्रेलिया) : १३ पीजीए टूरसह २९ किताब नावे.
- मार्क लॅशमन (ऑस्ट्रेलिया) : एका पीजीए टूरसह ९ किताब.
- कार्ल स्वार्टझेल (द.आफ्रिका) : २ पीजीए टूरसह १५ किताब.
- लुईस उस्थुइजेन (द.आफ्रिका) : एक पीजीए टूरसह १३ किताब.
बातम्या आणखी आहेत...