आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स बारमध्ये सुरू झाली होती या क्रिकेटरची लव्ह स्टोरी, पाहताच पडला प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड डॅनिएलासह स्मिथ.... - Divya Marathi
गर्लफ्रेंड डॅनिएलासह स्मिथ....
स्पोर्ट्स डेस्क- जागतिक सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला आणि आपल्या नेतृत्त्वाखालील रायजिंग पुणे सुपरजाएंटला प्ले-ऑफच्या दिशेने नेणा-या स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीवर पुणे संघाचे मालक खूष आहेत. गेल्या वर्षी धोनीच्या नेतृत्त्वाखालील पुणे संघ तळाला राहिला होता. त्यामुळे ओनर संजीव गोएंका यांनी धोनीकडचे कर्णधारपद काढून स्मिथकडे सोपवले. आता त्याचा रिजल्ट मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोएंका अॅंड कंपनी स्मिथवर खूष आहेत. 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीतच नाव कमावलेल्या स्टीव्ह स्मिथच्या क्रिकेट करिअरप्रमाणेच त्याची लव्हलाईफदेखील तेवढीच इंटरेस्टिंग आहे. त्याची आणि डॅनिएलाची भेट अगदी एखाद्या बॉलिवूड फिल्ममधील घटनेप्रमाणे डान्सबारमध्ये झाली. पहिल्याच नजरेत त्याला डॅनिएला आवडली होती. एवढेच नाही तर स्मिथ तिला भेटण्यासाठी त्या डान्सबारमध्येही नंतर जात होता.
 
फॅब फोरमध्ये स्मिथचा समावेश-
 
- क्रिकेटर स्टिव्ह स्मिथला खरं तर ऑस्ट्रेलियाचा विराट कोहली म्हटले गेले. मात्र नंतर तो लवकरच स्वत:च स्मिथ नावाचा ब्रॅंड बनला.
- जागतिक क्रिकेटमध्ये सध्या जे नवे फॅब फोर मानले जातात. त्यात स्मिथचा समावेश.
- विराट कोहली, केन विल्यमसन, ज्यो रूट आणि स्टीव्ह स्मिथ हे या दशकातील फॅब फोर मानले जातात. त्याआधी एबी डिव्हिलर्स, ख्रिस गेल यांच्यासारखी तगडी नावे होती. मात्र, काळाप्रमाणेच त्यात बदल होत आहेत.
- स्टीव्ह स्मिथ विराट प्रमाणेच क्रिकेट खेळाबरोबरच अफेअरमुळे चर्चेत राहिला आहे.
- स्टीव्ह आणि डॅनिएला विल्सची ओळख साधारणपणे चार वर्षांपूर्वी बिग बॅश लीगच्या वेळी एका डान्सबारमध्ये झाली होती.
- त्यावेळी डॅनिएला ही लॉ आणि कॉमर्स स्टूडेंट होती. पहिल्याच नजरेत स्टिव्ह तिच्या प्रेमात पडला होता.
- या भेटीनंतर दोघेही त्याच बारमध्ये भेटत होते.
 
असे मिळवले प्रेम...
 
- डॅनिएलाला क्रिकेटची प्रचंड आवड आहे.
- स्टीव्ह सांगतो की, डॅनिएला त्याची सर्वात मोठी समीक्षकही आहे. बस येथूनच आमच्या प्रेमाला सुरूवात झाली. 
- ती त्याच्या खेळा विषयी चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टी त्याच्याशी बिनधास्तपणे शेअर करते.
- दोघांतही प्रचंड खिलाडू वृत्ती असल्याने एकमेंकाकडे आकर्षित होण्यास वेळ लागला नाही.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, डॅनिएला- स्टीव्ह स्मिथचे फोटोज आणि सोबत जाणून घ्या त्यांच्या विषयी काही खास रोचक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...