आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललिताची दिव्‍य मराठीला मुलाखत, म्‍हणाली- नोकरी व अर्जुन पुरस्काराने आनंद द्विगुणित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रिओ ऑलिम्पिकवरून पतरल्यानंतर देशवासीयांकडून आणि विशेष करून माझ्या महाराष्ट्राकडून मिळत असलेला सन्मान मला खूप अभिमान देत आहे. सोमवारी मला एकाच दिवशी दोन चांगल्या बातम्या मिळाल्या. एक तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वर्ग-१ पदाची नोकरी देऊ केली आहे व अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. यामुळे मी प्रचंड आनंदी असल्याचे मत धावपटू ललिता बाबर हिने दैनिक दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले. या वेळी तिने साधलेल्या संवादाचा हा भाग...
पदकापेक्षा कौतुकाची थाप अधिक महत्त्वाची; अभिमान वाटतो
स्टिपलचेज प्रकारात दहाव्या क्रमांकावर राहिलेली ललिता म्हणाली, रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्याची खंत नक्कीच मनात आहे. मात्र, तिथे मी केलेली कामगिरी स्वत:लाच खूप प्रेरणा देऊन गेली आहे. राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातल्याचा आनंद मला मिळाला. त्यानंतर मायदेशी परतल्यानंतर विमानतळावर उतरल्यापासून ते आतापर्यंत जो सन्मान, शुभेच्छा मला मिळत आहे तो आनंद अवर्णनीय आणि अभिमानास्पद वाटत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, आणखी काय म्हणाली ललिता बाबर..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...