आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषभ पंतच्या नेतृत्वात गंभीर, धवन खेळणार; विजय हजारे ट्राॅफी: ऋषभकडे दिल्लीचे नेतृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रतिभावंत १९ वर्षीय युवा खेळाडू ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली गाैतम गंभीर अाणि शिखर धवन खेळणार अाहे. त्याच्याकडे दिल्ली संघाच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. दिल्लीचा संघ अागामी विजयी हजारे ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेत नशीब अाजमावणार अाहे. गुरुवारी डीडीसीएने स्पर्धेसाठी १५ सदस्यीय दिल्ली संघाची घाेषणा केली. टीममध्ये गाैतम गंभीर, अाशिष नेहरा अाणि शिखर धवनसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश अाहे. 
 
मागील सत्रापासून ऋषभ पंत उल्लेखनीय कामगिरी करत अाहे. त्याने रणजी सत्रामध्ये तिहेरी शतक ठाेकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने इतर सामन्यातही चमकदार कामगिरी केली. त्याने १० प्रथम श्रेणी सामन्यात १०२.९५ च्या सरासरीने १०८० धावा काढल्या. यामध्ये ४ शतके अाणि ३ अर्धशतकांचा समावेश अाहे. रणजीमधील सरस खेळीच्या बळावर त्याची इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली हाेती.   
 
ऋषभ पंत
१० प्रथम श्रेणी सामन्यात १०२.९५ च्या सरासरीने १०८० धावा
 
दिल्ली संघ
ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, गाैतम गंभीर, अाशिष नेहरा, मिलिंद कुमार, धुव्र शाेरे, सार्थक रंजन, हिंम्मत सिंग, नितीश राणा, मनन शर्मा, पवन नेगी, पुल्कित नारंग, प्रदीप संगवान, नवदीप सैनी, विकास टाेकस.
बातम्या आणखी आहेत...